लातूर शहर महापालिका प्रभाग क्रमांक-५ – नागरिकांचे आरोग्य धोक्यात, मनपाचा निष्काळजीपणा

रस्ते, पाणी, पथदिव्यांची व्यवस्था नव्याने विकसीत करण्याची गरज, गटारीतील घाण उचलणार नसाल तर गटारीच काढू नका!

लातूर (प्रतिनिधी ) : शहरातील प्रभाग क्रमांक ५ मध्ये गेल्या सात वर्षांत लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाने या प्रभागाकडे लक्षच दिले नाही़ त्यामुळे रस्ते, गटारी, पथदिवे, पिण्याचे पाणी, आरोग्याच्या सुविधा या सर्वच गोष्टी पुन्हा नव्याने विकसीत करण्याची गरज आहे़ महत्वाचे म्हणजे महापालिकेचे कर्मचारी गटारी साफ करता़ गटारीतील घाण गटारीच्या कडेवर टाकता आणि ती उचलतच नाही़ त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत असून गटारीतील घाण उचलणार नसाल तर गटारीच काढू नका, असे या प्रभागातील नागरिकांचे म्हणणे आहे.

प्रभाग क्रमांक ५ मध्ये मंठाळेनगर, डालडा फॅक्टरी, श्री शिवाजी हायस्कुल, मोचीगल्ली, बादाडेनगर, गौसपूरा हा भाग येतो़ मंठाळेनगरमध्ये सिमेंटचे रस्ते आहेत़ परंतु, या रस्त्यांची आता दुरवस्था झालेली आहे़ काही ठिकाणी खड्डे पडले आहेत तर काही ठिकाणी सिमेंट कॉक्रीट उखडून सळ्या बाहेर आल्या आहेत़ घंटागाडी नियमित येत नसल्यामुळे कचºयाची अडचण होत आहे़ महानगरपालिकेच्या शाळेच्या पाठीमागील रस्त्यावर कचरा साचला असल्याने तिथे मोकाट श्वान व डूकरांचा वावर आहे़ गौसपूरामध्ये माने टायरपासुन ते रिंगरोडपर्यंच्या मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत़ या रोडवर स्कॅ्रप मार्केट असल्यामुळे हेवी लोडेड वाहनांची सतत वर्दळ असते.

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होते़ या रोडची दुरुस्ती होणे आवश्यक आहे़ तसेच गौसपूरा गल्लीनंबर ५ मध्ये विजेचे खांब सिमेंटचे आहेत़ विजेच्या तारा खुप खालपर्यंत लोबत आहेत़ विजेच्या तारा ओडून घेणे आवश्यक आहे़ सम्राट चौक ते गणपती चौक ते रिंग रोड या रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने रस्ता लहान झाला आहे़ या रस्त्यावरील अतिक्रम  काढणे आवश्यक आहे़ बादाडेनगरमधील ग्रीन बेल्टची दुरावस्था झाली आहे़ ग्रीन बेल्टमध्ये गवत, काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत़ कंपाऊंड वॉलच्या लोखंडी जाळ्या गायब आहेत.

वडारवाड्याच्या पुर्वेस सार्वजनिक शौचालय आहे़ गेल्या अनेक वर्षांपासून या शौचालयाचे घाण पाणी गटारीत सोडलेले आहे़ गटारी साफ न केल्याने शौचालयाचे पाणी घरापर्यंत येते़ या  घाण पाण्याची दुर्गंधी असाह्य होते़ डासांचा प्रादुर्भाव बारामहिने आहे़ त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी नेहमीच असतात़ सार्वनिजक शौचालयाचे घाण पाणी गटारीत न सोडता टँकमध्ये सोडावे, असे ज्येष्ठ नागरीक लक्ष्मण हलकुडे यांनी सांगीतले़ गटार साफ करतात, पण गटारीतून निघालेली घाण तशीच टाकुन निघून जातात़ चार-पाच दिवसांनंतर ती घाण उचलण्यास येतात़ तोपर्यंत तर काढलेली निम्मी घाण पुन्हा गटारीत पडते़ गटार तुंबते, दुर्गंधी पसरते़ आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो, असे शेषाबाई रोहिले यांनी सांगीतले तर मैनाबाई गिरी म्हणाल्या, प्रभागात रस्ते आहेत़  परंतु,रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे घंटागाडी दारापर्यंत येत नाही़ आम्हालाच घरातील कचरा घंटागाडीपर्यंत नेऊन द्यावा लागतो, या समस्येकडे मनपा प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातुरात अण्णाभाऊ साठे जयंती सामाजिक उपक्रमांनी गाजली
01:38
Video thumbnail
Latur|'आरक्षणावरून समाजात तेढ नको' – माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचे आवाहन
05:23
Video thumbnail
Nanded|संतप्त नागरिकांनी थेट नगरपंचायत कार्यालयातच टाकला कचरा!
01:59
Video thumbnail
Parbhani|थारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; नातेवाईकांचा खुनाचा आरोप
03:58
Video thumbnail
शिवीगाळीनंतरही मोदींचा संयम; 'भरकटलेल्यांना योग्य मार्ग दाखवणं आपलं कर्तव्य'
03:06
Video thumbnail
Latur|छत्रपती शिवाजी महाराज चौक–दयानंद गेट रस्ता जलमय; वाहनचालकांना करावी लागतेय सर्कस
03:16
Video thumbnail
Latur Police Student Dialogue 2.0 | २ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांशी पोलीस साधणार थेट संवाद
06:41
Video thumbnail
Latur News | छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भुयारी मार्ग धोकादायक, नागरिकांचा संताप
03:51
Video thumbnail
Latur|सीताराम नगरात रस्ते जलमय; खड्ड्यांमुळे अपघात वाढले,मनपाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त
02:45
Video thumbnail
Nanded|धक्कादायक! वर्षभरापूर्वी बांधलेला पूल पुरात तुटला,उमरा–मेट मार्ग बंद; पुरामुळे वाहतूक ठप्प
01:10
Video thumbnail
जळकोट तालुक्यातील तिरु नदीला पूर; पावसाचा जोर कायम राहिल्यास वाहतूक विस्कळीत होण्याचा धोका
00:24
Video thumbnail
जळकोटला मुसळधार पावसाने झोडपले; पुराचा धोका लक्षात घेता प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
02:00
Video thumbnail
Nanded|धक्कादायक! थोड्याशा पावसात रस्ता खचला, कार थेट खड्ड्यात
02:08
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये पावसाचा जोर कायम; नदीकाठच्या गावांना अलर्ट!
01:10
Video thumbnail
Latur|लातूरचा 'आंबेडकर चौक' की तळं? थोड्याशा पावसातच रस्ता जलमय!
02:54

Latest news