28.1 C
Latur
Tuesday, June 25, 2024
Homeमहाराष्ट्रलक्ष्मण हाकेंची प्रकृती खालावली; उपोषणाचा आज चौथा दिवस

लक्ष्मण हाकेंची प्रकृती खालावली; उपोषणाचा आज चौथा दिवस

जालना : प्रतिनिधी
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सरकारने लेखी द्यावे यासाठी प्रा. लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे हे उपोषण करत आहेत.
आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. या दोघांचीही तब्येत खालावली आहे. लक्ष्मण हाके यांचा बीपी वाढला आहे. डॉक्टरांच्या पथकाकडून दोघांचीही तपासणी करण्यात आली आहे.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सरकारने लेखी द्यावे या मागणीवर लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे ठाम आहेत.

आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. दोघांचीही तब्येत खालावली आहे. दरम्यान, डॉक्टरांच्या पथकाने आज या दोघांची तपासणी केली आहे. लक्ष्मण हाके यांचा बीपी वाढल्याची माहिती डॉक्टरनी दिली आहे. त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या आणि एक्स्पर्ट डॉक्टरांचे ओपिनियन आवश्यक असल्याचे मत तपासणी करणा-या डॉक्टरांनी मांडले आहे.

दरम्यान, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे सांगितले असले तरी तो कसा लागणार नाही याबाबत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला सांगणे आवश्यक असल्याचे लक्ष्मण हाके म्हणाले. कायद्याला धरून नसलेल्या कुणबी नोंदी सरकार देत असेल तर ओबीसींचे मूळ आरक्षण कसे टिकेल हे देखील त्यांनी महाराष्ट्राला सांगावे असे आवाहन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केले आहे. तर त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांनी मुखमंत्र्यांना ओबीसी, एससी, एसटी समजाचा द्वेष आहे का? असा सवालही केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR