26.1 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeमहाराष्ट्रओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना कायदेशीर नोटीस

ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना कायदेशीर नोटीस

७ दिवसांत माफी मागा, अन्यथा कारवाईचा इशारा अजित पवारांविरोधातील बेताल वक्तव्य भोवले

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल नेहमी बेताल वक्तव्य करणा-या व त्यांना शिवराळ भाषेत बोलणा-या लक्ष्मण हाके यांच्या विरोधात कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन संजय यादव यांनी ही नोटीस बजावली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात वेळोवेळी जाणुनबुजुन बेताल वक्तव्य करणा-या विरोधात कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. शंतनु माळशिकारे यांच्या वतीने नितीन संजय यादव यांनी लक्ष्मण हाके यांना आज नोटीस बजावली. लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांची लेखी माफी न मागितल्यास लक्ष्मण हाके यांना न्यायालयात खेचून दिवाणी, फौजदारी व अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे नितीन यादव यांनी म्हटले आहे.

नोटीसमध्ये नेमके काय म्हटले?
लक्ष्मण हाके यांनी १९ जून २०२५ रोजी पुण्यामध्ये जाहीरपणे आरोप केला होता की, उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी महाज्योती योजनेला दुय्यम वागणूक दिली आहे. त्यानंतर ३ जुलै २०२५ रोजी मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे महाज्योती योजनेतील निधीच्या कथित कमतरतेवर लक्ष वेधण्यासाठी निदर्शनादरम्यान, हाके यांनी अजित पवार यांच्यासाठी हरामखोर या अपमानास्पद शब्दाचा वापर केला. इतकेच नाही, तर मालेगाव कारखाना निवडणुकीत पवारांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचाही आरोप करत, ओबीसी समुदाय त्यांच्यापासून दुरावल्याचे म्हटले होते.

हाकेंनी बिनशर्त सार्वजनिक माफी मागावी
१९ जून २०२५ (पुणे) आणि ३ जुलै २०२५ (मुंबई) रोजी केलेल्या बदनामीकारक विधानांसाठी अजित पवार यांची बिनशर्त सार्वजनिक माफी मागावी. ही माफी किमान तीन मोठ्या वृत्तपत्रांमध्ये (इंग्रजी, मराठी आणि हिंदी) प्रकाशित करावी आणि त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही पोस्ट करावी, जिथे ही विधाने प्रसारित केली गेली होती. हे सर्व नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत पूर्ण करावे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR