मुंबई : पक्षविरोधी कृती केल्यामुळे आपल्याला अपात्र का करू नये, अशी याचिका अजित पवार गटाने विधीमंडळात दाखल केली. याबाबत म्हणणे मांडण्यासाठी विधीमंडळाने शरद पवार गटातील ८ आमदारांना नोटीस बजावली आहे. आतापर्यंत शरद पवार गटातील १० आमदारांना नोटीस बजावली आहे. कारण या अगोदर जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर आता ८ आमदारांना नोटीस बजावली.
मात्र, अशोक पवार आणि मानसिंग नाईक यांना अद्याप नोटीस बजावण्यात आलेली नाही. तसेच नवाब मलिकांनीही तटस्थ भूमिका घेतल्याने त्यांनाही नोटीस नाही.पक्षविरोधी कृती केल्यामुळे आपल्याला अपात्र का करू नये, अशी याचिका अजित पवार गटाने विधीमंडळात दाखल केली होती. याबाबत म्हणणे मांडण्यासाठी विधीमंडळाने शरद पवार गटातील आमदाराना नोटीस पाठवली आहे. अजित पवार गटाने केलेल्या आरोपांवर आपले म्हणणे मांडण्यासाठी ८ दिवसांची वेळ देण्यात आली आहे. दरम्यान, शरद पवार गटाकडून लवकरच यावर उत्तर दाखल करणार आहे. शरद पवार गटातील अशोक पवार, मानसिंग नाईक यांना वगळून इतर आमदारांना नोटीस बजावली आहे. मात्र, अशोक पवार आणि मानसिंग नाईक यांची नावे का वगळली गेली, याबाबतचा खुलासा समोर आलेला नाही.
या आमदारांना बजावली नोटीस
अजितदादा गटाच्या याचिकेनुसार शरद पवार गटाचे अनिल देशमुख, राजेश टोपे, सुनिल भुसारा, प्राजक्त तनपुरे, रोहित पवार, सुमन पाटील, बाळासाहेब पाटील आणि संदीप क्षीरसागर या आमदारांना नोटीस पाठविण्यात आली.