38.5 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeराष्ट्रीयपंजाबमध्ये भाजपचा एकला चलो रे

पंजाबमध्ये भाजपचा एकला चलो रे

अकाली दलाशी युती नाही प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांची माहिती

अमृतसर : पंजाबमध्ये भाजप एकट्याने लोकसभा निवडणूक लढवणार आहे. याबाबतची घोषणा करताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड म्हणाले की, लोकांच्या मतानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचेही तेच मत आहे. पंजाबमध्ये लोकसभेच्या १३ जागा आहेत.

पंजाब, युवक, शेतकरी आणि व्यापारी आणि मागासवर्गीयांच्या भवितव्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ते म्हणाले की, गेल्या १० वर्षात शेतक-यांच्या पिकाचा एकेक दाणा जमा झाला आहे. करतारपूर कॉरिडॉरची जुनी मागणी पंतप्रधान मोदींनी पूर्ण केली. याआधी पंजाबमध्ये भाजप पुन्हा अकाली दलसोबत युती करणार असल्याची चर्चा होती. भाजपचे वरिष्ठ नेतेही त्यास अनुकूल होते. असे असूनही संवाद होऊ शकला नाही.

युती न होण्याची २ कारणे
अकाली दल आणि भाजपमध्ये पुन्हा युती न होण्याचे मुख्य कारण म्हणजे शेतकरी आंदोलन आणि बंदिवान शिखांची सुटका. या मुद्द्यांच्या मदतीने अकाली दल पंजाबमध्ये आपले मैदान पुन्हा शोधत आहे. या मुद्यांवरून माघार घेतल्यास त्यांना शेतकरी व पंथक मतांचे नुकसान सहन करावे लागू शकते. अशा परिस्थितीत त्यांनी हा मार्ग निवडला. मात्र, जाणकारांच्या मते यामुळे अकाली दलाचे कोणतेही नुकसान झालेले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR