27.5 C
Latur
Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रजागा वाटपाबाबतचा अंतिम निर्णय येत्या २८ रोजी

जागा वाटपाबाबतचा अंतिम निर्णय येत्या २८ रोजी

पुणे : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील महायुतीच्या जागा वाटपाबाबतचा अंतिम निर्णय येत्या २८ रोजी होर्णा­या संयुक्त बैठकीत घेण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कोंग्रेस पक्ष अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितली.

पक्षाची बैठक येथे झाली त्यानंतर ते बोलत होते बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ,सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील ,मंत्री धनंजय मुंढे ,आणि पदाधिकारी उपस्थित होते. ते म्हणाले महायुतीमधील तीन घटक पक्ष आणि मित्र पक्ष यांची संयुक्त बैठक होणार आहे त्यामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा आणि उमेदवार कोण याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. आणि त्यानंतर तो जाहीर करण्यात येणार आहे.

आमच्या पक्षाने योग्य जागा मागितल्या आहेत पण चर्चेत याबाबत निर्णय होईल. मात्र कार्यकर्त्यांचे समाधान होईल अशा जागा मागितल्या आहेत असे एका प्रशनाला उत्तर देताना त्यांनी सांगितले. माजी मंत्री विजय शिवतारे या निवडणुकीत अपक्ष म्हणून लढणार असून त्यांनी केलेल्या विधांनाबाबत विचारता ते म्हणाले याबाबत कोणतेही भाष्य करायचे नाही .

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR