34.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमुख्य बातम्याराम मंदिरातील भव्य महालात ४९५ वर्षांनंतर होळी

राम मंदिरातील भव्य महालात ४९५ वर्षांनंतर होळी

अयोध्या : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर यावर्षी अयोध्येत पहिल्यांदाच होळीचा सण साजरा झाला. अयोध्यावासींनी या सणाचा असा आनंद अनेक वर्षांनी घेतला. भगवान रामलल्ला यांच्या मंदिरात ४९५ वर्षानंतर भव्य होळी साजरी करण्यात आली.

अयोध्येतील होळीसाठी देशभरातून भाविक आले होते. अयोध्या रंगाच्या उत्सवात पूर्णपणे न्हाऊन निघाली. भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थळ असलेल्या मुथरा, वृंदावनप्रमाणे अयोध्येत यंदा होळीचा सण साजरा झाला.

रामल्ललाची मूर्ती सजवण्यात आली होती. मूर्तीच्या कपाळावर गुलाल लावला होता. गुलाबी वस्त्र परिधान केलेली रामलल्लाची मूर्ती आकर्षक दिसत होती. रामाची नगरी असलेल्या अयोध्येत यंदा होळी विशेष होती. अयोध्येतील सर्व मंदिरांमध्ये अबीर, गुलालाने होळी खेळण्याची परवानगी मिळाली होती.

रामाच्या दरबारात पुजारींनी भगवान श्रीरामाच्या मूर्तीवर फुलांची उधळण करत होळीला सुरुवात केली. होळीसाठी ५६ प्रकारच्या पदार्थांचा भोग लावण्यात आला. पुजा-यांनी होळीची गाणीही म्हटली. त्याचवेळी रामजन्मभूमी संकुलात रामल्ललाच्या दर्शनासाठी देशभरातून आलेल्या भाविकांचाही अनोखा उत्साह होता. भाविक भक्तीच्या रंगात रंगले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR