22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeक्रीडाविश्वचषक स्पर्धेची अक्षरश: पुनरावृत्ती

विश्वचषक स्पर्धेची अक्षरश: पुनरावृत्ती

मैदानाबाहेरून
दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आलेल्या यंदाच्या १९ वर्षांखालील विश्वचषक संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेला भारतीय संघ मोक्याच्या वेळी अंतिम सामन्यात दडपणा खाली आलाआणि ऑस्ट्रेलियाने भारताचा ७९ धावांनी धुव्वा उडवला पाच वेळा विश्वविजेते असलेल्या भारतीय संघाला सहाव्यांदा विजेते पद मिळवता आले नाही. कांगारूंनी चौथ्यांदा विश्वजेतेपद खिशात टाकले. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाने २०२३ मधील सलग चौथे जेतेपद पटकावले ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये झालेल्या वरिष्ठ विश्वचषक स्पर्धेची अक्षरश: पुनरावृत्ती झाली. यावेळी टीम इंडियाला अहमदाबाद येथील सामन्यात दणदणीत पराभव स्वीकारावा लागला होता.

वरिष्ठांच्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने धावांचा पाठलाग केला होता इतकेच. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांमध्ये ७ बाद २५३ धावा करत भारतासमोर २५४ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ सपशेल अपयशी ठरला. भारताचा युवा संघ निर्धारित ५० षटकंदेखील खेळू शकला नाही. टीम इंडियाला ४३.५ षटकांत अवघ्या १७४ धावांपर्यंत मजल मारता आली. सलामीवीर आदर्श सिंह (४७) आणि खालच्या फळीत मुरुगन अभिषेक (४२) या दोघांनी काही काळ प्रतिकार केला खरा, परंतु, या दोघांना दुस-या कुठल्याच फलंदाजाकडून साथ मिळाली नाही. त्यामुळे भारताला या सामन्यात पराभव पत्करावा लागला आदर्श सिंग आणि मुरुगन अभिषेकव्यतिरिक्त इतर कुठल्याही भारतीय फलंदाजाला खेळपट्टीवर टिकता आलं नाही.

संघातील ७ खेळाडू दुहेरी धावसंख्यादेखील गाठू शकले नाहीत. अर्शीन कुलकर्णी (३), कर्णधार उदय सहारन (८), मुशीर खान (२२), सचिन धस (९), प्रियांशू मोलिया (९), अरवली अविनाश राव (०), राज लिंबानी (०), सौमी कुमार (२) हे खेळाडू सपशेल अपयशी ठरले. तर नमन तिवारी ११ धावांवर नाबाद राहिला, भारताच्या संघव्यवस्थापनाने या सामन्यात आणखी एका जलदगती गोलंदाजाला संधी द्यायला हवी होती. भारताने पहिल्या डावात गोलंदाजी करताना सुरुवातीच्या २० पैकी ६ षटकं जलदगती गोलंदाजांकरवी खेळवली. तर उर्वरित १४ षटकं फिरकीपटूंनी टाकली. या २० षटकांमध्ये भारताला केवळ एक बळी मिळवता आला. हा बळी जलदगती गोलंदाज राज लिंबानी याने टिपला.

तसेच या सामन्यात भारताकडून सर्वाधिक ३ बळी राजनेच टीपले. दुस-या बाजूला ऑस्ट्रेलियाने भारतापेक्षा वेगळी योजना आखली होती आणि त्या योजनेत कांगारू पूर्णपणे यशस्वी ठरले. दुस-या बाजूला ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीत वैविध्य पाहायला मिळालं. कर्णधार ू वैबगेनने सर्व गोलंदाजांचा पुरेपूर वापर केला. प्रत्येक गोलदांजाकडून योग्य वेळी हव्या त्या पद्धतीने गोलंदाजी करून घेतली. परिणामी कुठल्याच भारतीय फलंदाजाला डोकं वर काढण्याची संधी मिळाली नाही. ऑस्ट्रेलियाकडून राफेल मॅकमिलन याने ३, मढ्डी बीअर्डमनने ३ आणि कॉलम विडलरने २ बळी टीपले. तर, चार्ली अँडरसन आणि टॉम स्ट्रॅकरने प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केलं.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या २० षटकांपैकी १९ षटकं जलदगती गोलंदाजांकरवी खेळवली. तर केवळ एकाच षटकात फिरकीपटूचा वापर करण्यात आला. परिणामी पहिल्या २० षटकांत भारत केवळ ६८ धावा जमवू शकला. तसेच भारताचे चार फलंदाज माघारी परतले. तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या २० षटकांत एका गड्याच्या बदल्यात ९० हून अधिक धावा जमवल्या होत्या. ही २० षटकंच सामन्याचं भवितव्य ठरवणारी होती.
डॉ. राजेंद्र भस्मे
कोल्हापूर, मोबा. ९४२२४ १९४२८

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR