22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसोलापूरलोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

सोलापूर : लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराची घोषणा सोलापुरात करण्यात आली आहे. रविवार ७ जानेवारी २४ रोजी सायंकाळी ६ वाजता हि.ने. वाचनालय हा सोलापूरच्या किर्लोस्कर सभागृहात होणार आहे. लोकमंगल साहित्य पुरस्काराचं यंदाचं हे नववं वर्ष आहे. यंदाचे लोकमंगल फाऊंडेशन आयोजित, लोकमंगल वाचनालय पुरस्कृत पुरस्कार घोषित करण्यात आले.

निर्मला पाटील यांच्या आत्मकथन या कादंबरीसाठी लेखिका शांता गोखले, काळ्या निळ्या रेषा या आत्मचरित्रासाठी राजू बाविस्कर यांना तर गौतम बुद्ध या कादंबरीसाठी वसंत गायकवाड यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. २५ हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह आणि सोलापुरी चादर असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याचबरोबर साहित्य क्षेत्रातील लक्षणीय कार्याबद्दल व्यक्ती किंवा संस्थेला देण्यात येणारा पुरस्कार कलासक्त पुणे या संस्थेस जाहीर झाला आहे. भाषांतर या त्रैमासिकासाठी संपादिका सुनंदा महाजन यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच सोलापुरी साहित्याला देण्यात येणारा पुरस्कार झांबळ या कथासंग्रहासाठी समीर गायकवाड यांना देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप ११ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह असे आहे. या कार्यक्रमास राजीव खांडेकर संपादक एबीपी माझा न्युज हे राहणार आहेत.पुरस्कार निवड समितीचे सदस्य नीतिन वैद्य, प्रा. डॉ. ऋचा कांबळे, शिरीष देखणे व डॉ. दत्ता घोलप हे होते. या पुरस्कारासाठी समन्वयक म्हणून शोभा बोल्ली आहेत.

पत्रकार परिषदेत लोकमंगलचे संस्थापक आ. सुभाष देशमुख यांनी ही माहिती दिली. यावेळी समितीचे सदस्य ऋचा कांबळे, शिरीष देखणे, दत्ता घोलप, समन्वयक शोभा बोल्ली, अनिता ढोबळे आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR