अहमदाबाद : आयपीएलच्या ६४ व्या लखनौ आणि गुजरातच्या सामन्यात लखनौने गुजरातचा ३३ धावांनी पराभव केला. गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता लखनौ सुपर जायंट्सने २० षटकांत २ गडी गमवून २३५ धावा केल्या आणि विजयासाठी २३६ धावांचे आव्हान दिले होते. यात मिचेल मार्शने ११७ तर निकोलस पूरनने नाबाद ५६ धावांची खेळी केली.
गुजरात टायटन्सचे सहज टॉप २ मध्ये राहण्याचे स्वप्न भंगले आहे. कारण आता टॉप २ स्थानाची शर्यत चुरशीची झाली आहे. आता गुजरात टायटन्स गुणतालिकेत टॉपला असली तरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्सला एक संधी अधिक आहे. आयपीएल २०२५ स्पर्धेतील ६४ वा सामना गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात रंगला. हा सामना लखनौ सुपर जायंट्सने सहज जिंकला. लखनौचं प्लेऑफचं स्वप्न आधीचे भंगले आहे. पण गुजरात टायटन्सच्या टॉप २ मार्गात खोडा घातला आहे.
लखनौ सुपर जायंटस्रे २० षटकांत २ गडी गमवून २३५ धावा केल्या आणि विजयासाठी २३६ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान गाठताना शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी चांगली सुरुवात केली. मात्र त्यानंतर विकेट टप्प्याटप्प्याने पडल्या आणि विजयी धावांचे अंतर वाढले. अखेर लखनौ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्सचा ३३ धावांनी पराभव केला. गुजरात टायटन्सने २० षटकात ९ गडी गमवून २०२ धावा केल्या.