22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसोलापूरएम.राजकुमार सोलापूरचे पोलिस आयुक्त

एम.राजकुमार सोलापूरचे पोलिस आयुक्त

सोलापूर : महाराष्ट्र राज्याच्या गृहविभागाच्या वतीने ४४ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. यामध्ये सोलापूरचे पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांची बदली महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक येथे सहसंचालक म्हणून झाली. तर सोलापूरच्या पोलिस आयुक्तपदी जळगावचे पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांची पदोन्नतीने वर्णी लागली आहे. या आदेशावर शासनाचे सचिव व्यंकटेश माधव भट यांची स्वाक्षरी आहे.

सोलापूर पोलिस आयुक्तालयामध्ये पोलिस आयुक्त म्हणून बदली झालेले एम. राजकुमार यांची डॅशिंग अधिकारी म्हणून ओळख असल्याचे सांगण्यात येत आहे. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याच्या बाबतीत थेट मोहीम आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी त्यांनी जळगाव येथे दहा महिन्यात तब्बल ४२ जणांना एमपीडीएअंतर्गत स्थानबद्ध केले असल्याचे सांगण्यात येत आहे.पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या दीड वर्षाच्या कार्यकालानंतर त्यांची बदली महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक येथे सहसंचालक म्हणून झाली असून, ९ जून २०२२ मध्ये त्यांनी सोलापूरच्या पोलिस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली होती.

३० जून रोजी २०२४ रोजी सेवेतून निवृत्त होणार आहेत. त्यांच्या कार्यकाळात तडीपार, एमपीडीए यासह गंभीर गुन्ह्याचा तपासासाठी गुन्हे शाखेने घरफोड्या, जबरी चोऱ्या उघडकीस आणण्यावर भर दिला.सोलापूरचे नवीन पोलिस आयुक्त एम. राजकुमार हे जळगाव येथे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. पोलिस प्रशासनात त्यांनी १३ वर्षे सेवा बजावली आहे. पोलिस प्रशासनात कार्य : यवतमाळ, नागपूर व अन्य ठिकाणी पोलिस खात्यात सेवा करून जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षकपदाचा पदभार घेतल्यानंतर जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा बसावा, म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्याची कारवाई सुरू केली. दहा महिन्यांत तब्बल ४२ जणांना एमपीडीएअंतर्गत स्थानबद्ध केले. त्यांच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसण्यास मोठी मदत झाली.

गडचिरोली येथे पोस्टिंगदरम्यान नक्षलविरोधी कारवायांसाठी त्यांना दोन शौर्य पदके मिळवणारे एम. राजकुमार हे महाराष्ट्र केडरमधील पहिले आयपीएस अधिकारी आहेत. आतापर्यंत त्यांनी पोलिस उपअधीक्षक, उमरगा (धाराशिव जिल्हा), अपर पोलिस अधीक्षक (ऑपरेशन्स) गडचिरोली, डीसीपी (सायबर गुन्हे) मुंबई, डीसीपी नागपूर, पोलिस अधीक्षक यवतमाळ, पोलिस अधीक्षक नागपूर, रेल्वे पोलिस अधीक्षक जळगाव अशी सेवा बजावली आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR