बीड : शहरात ओबीसींचा महाएल्गार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सभेसाठी मंत्री छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर, महादेव जानकर इत्यादी प्रमुख नेते सभेसाठी उपस्थित होते. यावेळी महादेव जानकर यांनी आपले भाषण थांबवत छगन भुजबळ यांना चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले.
महादेव जानकर हे भाषण करण्यासाठी उभे होते. यावेळी भाषण थांबवत त्यांनी व्यासपीठावर असलेल्या छगन भुजबळ यांचे चरणस्पर्श केले. आज मुंडे साहेब हयात नाहीत. पण, छगन भुजबळ जिवंत आहेत. आम्ही तुमच्याकडे वडिलधारे म्हणून पाहतो. आज मी तुमचे पाय धरणार आहे. तुम्हाला मुख्यमंत्री करायचे आहे. त्यासाठी आम्ही जिवाचे पाणी करु, असे म्हणत ते भुजबळांच्या चरणी नतमस्तक झाले.