34.9 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ठाकरे गटात

महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ठाकरे गटात

मुंबई : प्रतिनिधी
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आज शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. त्यांनी ५०० गाड्यांच्या ताफ्यासह मातोश्रीवर जाऊन जोरदार शक्तीप्रदर्शन करत पक्षप्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांचे जंगी स्वागत करतानाच सांगली लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली. यामुळे जागावाटपात सांगली लोकसभेची शिवसेना ठाकरे गटाला गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठाकरेंनी सलग दुस-या दिवशी उमेदवार जाहीर करत रणनीती स्पष्ट केली आहे. यापूर्वी त्यांनी उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल किर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केली. यावेळी चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना गदा भेट दिली. यावेळी सांगली लोकसभा संघटकपदी चंद्रहार पाटील यांच्या नियुक्तीची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, माझी छाती अभिमानाने फुलून आली आहे. किती इंच झाली सांगणार नाही. चंद्रहारची छाती पाहून सांगलीत लढायची कोणाची छाती होणार नाही. पळकुटे नामर्द पळून जात आहेत. मर्द शिवसेनेत येत आहेत. तुम्ही बोर्ड हातात धरला आहे, पण नुसत्या घोषणा देऊन नाही चालणार. जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. चंद्रहार पाटील यांनी सांगितले तुम्ही काही तरी संकेत द्या. आता जनतेने संकेत दिले आहेत, आता मी काय संकेत देऊ, असे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR