27.9 C
Latur
Tuesday, May 13, 2025
Homeमहाराष्ट्रमहायुती लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार

महायुती लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार

साता-यात शुक्रवारी बैठक. रविवारी महामेळावा होणार

सातारा : लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असून या पार्श्वभूमीवर महायुतीची महत्वाची बैठक शुक्रवारी साता-यातील शासकीय विश्रामगृहावर होणार आहे. यामध्ये युतीतील सर्व घटकपक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी सहभागी होणार आहेत. तर याच बैठकीतच रविवारी साता-यातील महामेळाव्याचे नियोजन होणार असून यावेळी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीची घोषणा फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. उमेदवार कोण यापेक्षा आघाडी किंवा महायुती भक्कम दाखविण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. त्यामुळेच एक महिन्यापूर्वी महाविकास आघाडीची बैठक साता-यातील राष्ट्रवादी भवनमध्ये झाली होती. त्यानंतर महायुतीनेही आम्हीही मागे नाही हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

या अनुषंगानेच युतीतील नेत्यांची बैठक शुक्रवार, दि. १२ रोजी साता-यातील शासकीय विश्रामगृहावर होत आहे. या बैठकीला युतीचे जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, प्रमुख नेते, पदाधिकारी यांना निमंत्रण देण्यात आलेले आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारी दोनला होणा-या बैठकीत सर्वांची एकी दाखविण्याचा प्रयत्न राहणार आहे. तसेच याच बैठकीत साता-यात रविवार, दि. १४ जानेवारी रोजी महायुतीचा मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR