27.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्र‘लाडकी बहीण’चे फॉर्म भरणा-या सेविका मानधनापासून वंचित

‘लाडकी बहीण’चे फॉर्म भरणा-या सेविका मानधनापासून वंचित

सांगली : प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रतिफॉर्म ५० रुपये प्रोत्साहनपर पैसे देण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली होती; पण त्यांना अद्याप एक रुपयादेखील मिळालेला नाही.

लाडक्या बहिणीच्या खात्यावर या योजनेचे पैसे आले व अजून येणे सुरूच आहे; परंतु रात्रंदिवस कष्ट करून या योजनेचे फॉर्म भरणा-या अंगणवाडी सेविका मात्र वंचितच आहेत. शासनाने दिलेला शब्द पाळला नसल्याची त्यांची भावना आहे. सुमारे अडीच हजार सेविकांनी ऑगस्टपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याचे काम केले होते.

योजनेचे सुमारे पाच हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले. या माध्यमातून त्यांना साडेसात हजार रुपये मिळाले आहेत. रोकड हातात असल्याने महिलांचा दिवाळी सण जल्लोषात साजरा होणार आहे; पण त्यांना हे पैसे मिळवून देण्यात हातभार लावणा-या सेविका मात्र कष्टाच्या पैशांची वाट पाहत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR