34 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeराष्ट्रीययंदा मान्सून बरसणार सरासरीहून जास्त!

यंदा मान्सून बरसणार सरासरीहून जास्त!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आशिया-प्रशांत आर्थिक सहकार्य (एपीसीसी) जलवायू केंद्राने भारतातील यंदाच्या मान्सूनबद्दलचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. एप्रिल ते जून आणि जुलै ते सप्टेंबर या कालावधीत बरसणा-­या पावसाबद्दलचे दोन वेगवेगळे अंदाज ‘एपीसीसी’ने बांधलेले आहेत. त्यानुसार यंदा देशात जुलै ते सप्टेंबरपर्यंतच्या मुख्य मान्सूनदरम्यान सरासरीहून अधिक पाऊस बरसणार आहे.

‘एपीसीसी’ने याआधी १५ मार्च रोजी ‘ईएनएसओ’ अलर्ट सिस्टीम अपडेटबद्दलची माहिती दिली होती. ही स्थिती (ईएनएसओ) एप्रिल ते सप्टेंबर २०२४ या कालावधीसाठीच्या ‘ला नीना’चे भाकित वर्तविते. ‘एपीसीसी’ जलवायू केंद्राने आपल्या जुलै ते सप्टेंबरसाठीच्या अंदाजात, पूर्व आफ्रिकेहून अरबी समुद्र, भारत, बंगालचा उपसागर, इंडोनेशिया आणि कॅरेबियन समुद्रापर्यंत पसरलेल्या भागात सरासरीहून अधिक पाऊस पडणार असल्याचे नमूद केले आहे.

याआधी भारतीय हवामान विभागाने (आयएमडी), मे महिन्यानंतर प्रशांत क्षेत्रात ‘अल निनो’ आणि अपेक्षित ‘ला नीना’ स्थितीच्या अल्प प्रभावामुळे भारतात यंदा मान्सूनमध्ये पुरेसा पाऊस होईल, अशी शक्यता वर्तविली होती.

‘अल निनो’चा उद्भव मध्य प्रशांत महासागरातील पाण्याच्या वेळोवेळी तापण्यातून होतो. त्याचा भारतीय उपखंडातील हवामानावर थेट परिणाम होतो.
मध्य आणि पूर्व मध्य भूमध्यरेषीय प्रशांत महासागर क्षेत्रातील पृष्ठभागाचे वेळोवेळी गार होणे हे ‘अल नीना’च्या उद्भवाचे निमित्त होय. सामान्यपणे ‘ला नीना’च्या घटना दर ३ ते ५ वर्षांत घडत असतात. कधी कधी त्या दरवर्षीही घडतात. जून-सप्टेंबरमधील मान्सून पिकांसाठी पाणी आणि जलाशये तुडुंब भरावीत म्हणून जवळपास ७० टक्के पर्जन्याचे दान ‘ला नीना’मुळे आपल्या पदरात पडते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR