ममदानींचे आरएसएसने टोचले कान

न्यूयॉर्क : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दृष्टी आणि विचारसरणी यांविषयी अधिक जाणून घेण्यास इच्छुक असलेल्या कोणालाही आम्ही संवादाच्या या खुल्या मंचांमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण देतो असे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी न्यूयॉर्कमध्ये आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतअमेरिका दौ-यावर आहेत. मोहन भागवत यांच्या या अमेरिका दौ-यावरून अमेरिकेत अनेक ठिकाणी विरोध सुरू आहे. मोहन भागवत हे २९ ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथील इन्फोसिस थिएटरमध्ये युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन्स कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. विविध धर्म आणि संस्कृतींच्या लोकांचा हा आंतरधर्मीय कार्यक्रम असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर सुनील आंबेकर यांनी एक्सवर पोस्ट करत या कार्यक्रमाबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.दरम्यान, न्यूयॉर्कमधील मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करणा-या अहेड फोरम या संस्थेचे एक्स अकाऊंट सस्पेंड करण्यात आले होते.

हे अकाऊंट पुन्हा सुरू करण्याबाबत संस्थेने विनंती केली होती. काही तासांतच आता हे अकाऊंट पूर्ववत करण्यात आले आहे. आयोजकांनी एका पोस्टद्वारे खाते पूर्ववत झाल्याची माहिती दिली. विरोधकांनी बॉट हल्ला करून अल्गोरिदममध्ये फेरफार करून हे हँडल ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता. आता, पुन्हा त्या गोष्टीकडे वळूया जी खरोखर महत्त्वाची आहे: वैश्विक सुसंवाद आणि वैश्विक एकात्मता यांचा उत्सव साजरा करणे, असे या संस्थेने म्हटले आहे. अकाऊंट पूर्ववत झाले असले तरी, या घटनेमुळे अमेरिकेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

न्यूयॉर्कमध्ये साजरा होणार विश्व-एकात्मता सोहळा
न्यूयॉर्कमधील युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन (विश्व-एकात्मता सोहळा) हा विविध धर्म, संस्कृती आणि श्रद्धा असलेल्या जनसमुदायाशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत संवाद साधणार असून, हा एक आंतरधर्मीय मेळावा आहे. मुक्त संवाद आणि परस्पर आदराच्या भावनेतून आयोजित केलेला हा कार्यक्रम भारतीय जीवनमूल्यांचे प्रतिबिंब दर्शवतो; ही मूल्ये मुळातच सर्वसमावेशक असून सर्वांचे स्वागत करणारी आहेत. हा उपक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच फररच्या दीर्घकालीन परंपरेशी सुसंगत आहे, ज्याद्वारे भारत आणि जगभरातील विविध समुदायांशी संवाद साधून परस्पर सामंजस्य व सामायिक उद्दिष्टे जोपासली जातात, असे सुनील आंबेकर यांनी नमूद केले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|नारळी पौर्णिमेला माहूर गडावर भाविकांची अलोट गर्दी; हजारो जण पायी दत्त शिखराकडे
00:39
Video thumbnail
Latur|बुलेटवर फटाका वाजवताय? सावधान! लातूर पोलिसांची थेट कारवाई
01:47
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो लक्ष द्या! १ सप्टेंबरपासून महामार्गावर हेल्मेट सक्ती;हेल्मेट नाही तर दंड
02:38
Video thumbnail
Nanded Murder|नांदेडमध्ये रक्तरंजित थरार! जुन्या वादातून तरुणाचा खंजरने खून
00:50
Video thumbnail
Latur|नांदगाव ग्रामसभेत मोठा गोंधळ! प्रश्नांवरून सत्ताधारी-विरोधक भिडले
07:02
Video thumbnail
PARBHANI|गौरवाच्या क्षणांची साक्ष... सन्मानार्थींच्या प्रतिक्रिया
31:41
Video thumbnail
NANDED|एकमतच्या सन्मानाची... सन्मानार्थींच्या मनातील भावना
45:46
Video thumbnail
DHARASHIV|गौरवाच्या क्षणांची साक्ष... सन्मानार्थींच्या प्रतिक्रिया
42:06
Video thumbnail
Solapur|एकमत वर्धापन गौरव २०२६... सन्मानार्थींच्या प्रतिक्रिया
28:21
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - परभणी
02:04:02
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - नांदेड
02:12:44
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - धाराशिव
02:10:21
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत- सोलापूर
02:13:30
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52

Latest news