मुंबई : नवी मुंबईतील वाशी येथे येऊन शासकीय अध्यादेश घेऊन उपोषणकर्ते मनोज जरांगे माघारी फिरले होते. आपल्या मुंबईतील आझाद मैदानावरील उपोषणाची त्यांनी येथूनच सांगता करत विजयी जल्लोषही केला.
मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याचा आनंद सर्वांनी साजरा केला. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही वाशीत येऊन मनोज जरांगेंना ज्यूस पाजून त्यांचं उपोषण सोडले. मात्र, मनोज जरांगे आजपासून पुन्हा उपोषणाला बसले आहेत. जालना जिल्हयातील अंतरवाली सराटी गावातून त्यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे.
सरकारने दोन दिवसांत विशेष अधिवेशन बोलावून सगेसोयरे शब्दाच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करावे, अशी प्रमुख मागणीही त्यांनी यावेळी केली.