33.6 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रसत्ताधा-यांविरोधात शिवसेनेची सह्यांची मोहीम

सत्ताधा-यांविरोधात शिवसेनेची सह्यांची मोहीम

झुंडशाही-गुंडशाही असल्याचा आरोप

पुणे : राज्यातील सत्ताधा-यांच्या माध्यमातून झुंडशाही-गुंडशाही-भ्रष्टाचार वाढवण्याचे काम केले जात असल्याचा आरोप करत या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे शहराच्या वतीने सह्यांची मोहीम राबवून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच सत्ताधा-­यांच्या विरोधात घोषणाबाजी करत महाराष्ट्रात अशांतता पसरवू पाहणा-­या नितेश राणेला अटक करा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, काँग्रेस नेते मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन कदम, शांतीलाल सुरतवाला, उपशहरप्रमुख बाळासाहेब मालुसरे, प्रशांत राणे, भरत कुंभारकर, प्रशांत बधे, राजेश पळसकर, शहरसंघटक राजेंद्र शिंदे, प्रसिद्धीप्रमुख अनंत घरत यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते. या मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच महिला आघाडीच्या वतीने सह्यांच्या फलकावर बांगड्यांचा आहेर लावून निषेध नोंदविण्यात आला .

संजय मोरे म्हणाले, भाजपचा वाचाळवीर नितेश राणेच्या ‘सागर बंगल्यावर आमचा बॉस बसलाय. कोणी काही करू शकत नाही’, या वक्तव्यामुळेच ठाण्यात आमदार गणपत गायकवाड याने पोलिस ठाण्यात अंदाधुंद गोळीबार करायचे धाडस केले. अनेक गुन्हेगारांना मंत्रालयापर्यंत, मुख्यमंत्रीच घेऊन फिरतात. पुणे शहरात उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात भाजप आमदार पोलिस शिपायास कानाखाली मारतो. या सर्व गोष्टी गृहमंत्र्यांचे अपयश दर्शवतात. गजानन थरकुडे म्हणाले, महाराष्ट्र सरकारचे काम चुकीचे चालले आहे, आणि नागरिकांच्या भावना सरकारच्या विरोधात तीव्र आहेत. त्यांना वाचा फोडण्यासाठी सह्यांची मोहीम घेतली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR