28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयभीषण आग लागून अनेक बस जळून खाक

भीषण आग लागून अनेक बस जळून खाक

बंगळुरू : बेंगळुरूमधील वीरभद्र नगरजवळील एका गॅरेजमध्ये आज म्हणजेच सोमवारी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत अनेक बस जळून खाक झाल्या आहेत. सध्या अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. वीरभद्र नगरजवळील एका गॅरेजमधून ही आग पसरल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. यासोबतच अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही.

अग्निशमन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बस गॅरेजमध्ये उभ्या होत्या. अग्निशमन दल घटनास्थळी असून आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तसेच या भीषण आगीत पाच-सहा बसेस जाळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR