अनेकांचे मुखवटे गळून पडणार: भोंदू अशोक खरातच्या कारनाम्यांवर आधारित चित्रपटाचा टीझर आऊट; २ ऑक्टोबरला होणार रिलीज.

‘महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला असून या टीझरने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. राज्यभर गाजलेल्या नाशिकमधील भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांवर हा चित्रपट आधारित असून, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची भूमिका अभिनेत्री दिपाली सय्यद साकारत असल्याचे समोर आले आहे. टीझरमध्ये दिपाली सय्यद यांचा पहिला लूक जाहीर करण्यात आला असला, तरी मुख्य खलनायक अशोक खरातच्या भूमिकेत कोणता अभिनेता आहे, हे अद्याप गुप्त ठेवण्यात आले आहे.

हा चित्रपट ‘आता सगळं उघड होणार…!’ ही अत्यंत खळबळजनक टॅगलाईन घेऊन २ ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नाशिकच्या भोंदू अशोक खरातने अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले होते. या प्रकरणात राज्यातील अनेक बडे राजकारणी, सनदी अधिकारी आणि प्रतिष्ठित व्यक्ती त्याचे भक्त असल्याचे समोर आले होते. याच प्रकरणात रुपाली चाकणकर यांचे खरातशी आर्थिक संबंध असल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांना आपल्या महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

अशोक खरातचे कारनामे समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्या खरातच्या डोक्यावर छत्री धरून उभ्या असल्याचे दिसत होत्या. नेमका हाच वादग्रस्त प्रसंग या चित्रपटाच्या टीझरमध्ये हुबेहूब दाखवण्यात आला असून, त्यात दिपाली सय्यद खरातच्या डोक्यावर छत्री धरताना दिसत आहेत. या चित्रपटामुळे समाजातील आणि राजकारणातील अनेक तथाकथित प्रतिष्ठित लोकांचे सभ्यतेचे मुखवटे गळून पडतील, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

चित्रपटाची मूळ कथा सध्या गुलदस्त्यात ठेवली असून इतर कलाकारांची नावेही जाहीर केलेली नाहीत. या चित्रपटाची कथा सागरकुमार एस. जैन यांनी लिहिली असून, पटकथा आणि संवादलेखन संजय नवगिरे यांनी केले आहे. चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी आकाश काकडे यांनी सांभाळली असून, कला दिग्दर्शन अक्षय आंबेकर यांनी केले आहे. तसेच आकांक्षा गांधी यांनी वेशभूषा केली असून, सचिन घणवंत हे प्रोडक्शन हेड आणि नेहा घोडके या प्रोडक्शन कंट्रोलर म्हणून काम पाहत आहेत. आगामी २ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news