28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeसोलापूरपंढरपुरात मराठा समाज आक्रमक; आमदार, खासदार, मंत्री पंढरपुरात आल्यास काळे फासण्याचा दिला इशारा

पंढरपुरात मराठा समाज आक्रमक; आमदार, खासदार, मंत्री पंढरपुरात आल्यास काळे फासण्याचा दिला इशारा

प्रतिनिधी : मंदिर समितीने कुठलेहि मंत्री, आमदार, खासदार यांना कार्तिकी वारी व इतर कार्यक्रमासाठी आमंत्रण देऊन बोलवू नये अन्यथा तसे आमंत्रण दिल्यास व कुठलाही आमदार,खासदार,मंत्री मंदिरात आल्यास त्याचा तीव्र निषेध करून काळे फसले जाईल असा इशारा पंढरपूर येथील सकल मराठा समाजाने दिला आहे. याबाबतचे निवेदन नुकतेच पंढरपुरात कार्तिकी वारी साठी नियोजन बैठकीस आलेल्या जिल्हाधिका-यांना मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले.

यावेळी नागेश भोसले,किरणराज घाडगे, संदीप मांडवे, संतोष कवडे यांच्यासह मराठा समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.पंढरपूर शहर व तालुक्यात गेली काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा समाज बांधवांनी गावागावात साखळी उपोषण सुरू करून विविध पक्षातील नेत्यांना गावबंदी केली आहे. याचबरोबर येथील लोकप्रतिनिधींची गाडी वाढवण्यात आली होती. तसेच देगाव येथे एका युवकांनी मराठा आरक्षणासाठी रक्ताने पत्र लिहून मुख्यमंर्त्यांना पाठवले होते. यानंतर आता थेट खासदार, आमदार,मंत्री यांना पंढरपुरात आल्यास काळे फासणार असल्याचा इशारा येथील मराठा समाजाने दिल्याने आंदोलक आक्रमक झाले असल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR