24.3 C
Latur
Tuesday, June 25, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा तरुणांनो आत्महत्या करू नका; सुनील तटकरे

मराठा तरुणांनो आत्महत्या करू नका; सुनील तटकरे

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देताना धनगर व ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक पावले उचलत आहे. त्यामुळे मराठा समाजाला आगामी कालावधीत आरक्षण मिळेल, असा विश्वास व्यक्त करत मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या करून आपला जीव गमावू नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले आहे.

नेरूळ येथील ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांनी सांत्वन केले. यावेळी नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष नामदेव भगत आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सुनील तटकरे यांनी विविध प्रश्नांवर आपली भूमिका मांडली.

मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी बोलताना शेतक-यांनी मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत विचार-विनिमय सुरू आहे. यापूर्वी दोन वेळा आरक्षण दिले; परंतु कायद्याच्या चौकटीत आरक्षण न बसल्याने मराठा समाजाला उपेक्षित राहावे लागले. आताचे सरकार केवळ आरक्षणाची घोषणा करणारे नसून न्यायालयात टिकेल अशा प्रकारचे आरक्षण देण्याचे भूमिका असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR