22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रगिरगावमध्ये भीषण आग, दोघांचा होरपळून मृत्यू

गिरगावमध्ये भीषण आग, दोघांचा होरपळून मृत्यू

मुंबई : मुंबईतील गिरगाव चौपाटी भागातून आगीची मोठी दुर्घटना समोर आली आहे. गिरगावमधील एका चार मजली इमारतीला आग लागली. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तीन मजली इमारतीच्या तिस-या मजल्यावर शनिवारी रात्री ही आग लागली. या आगीच्या घटनेची माहिती मिळाल्यावर अग्निशमन दलाच्या १५ गाड्या दाखल झाल्या.

अग्निशमन दलाने दोन तास प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी नऊ जणांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र या घटनेत हिरेन शाह (वय ६०) आणि नलिनी शाह (८२) या दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान रेस्क्यू करून काढलेल्या नऊ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गिरगावमध्ये ही आग कशामुळे लागली, याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही. परंतु पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी
गिरगाव चौपाटीमध्ये काल आग लागली होती, त्या ठिकाणी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत करण्याचे आदेश दिले. ज्यांचे घर जळालेले आहे त्यांना पाच लाखांची मदत तात्काळ जाहीर केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR