30.7 C
Latur
Wednesday, April 16, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरबीडमध्ये आणखी एका टोळीवर मकोका प्रस्तावित

बीडमध्ये आणखी एका टोळीवर मकोका प्रस्तावित

अवादा कंपनीतील प्रकल्पावरील चोरीनंतर कारवाईचा प्रस्ताव

बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मीक कराड गँग, बीडमधील आठवले गँग आणि आष्टी तालुक्यातील खुन प्रकरणातील टोळीवर मकोका नुसार गुन्हा नोंद केल्यानंतर आणखी एका दरोडेखोरांच्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. विडा (ता. केज) येथील अवादा कंपनीच्या उभारणी सुरु असलेल्या पवनचक्कीवरून ता. सात एप्रिल रोजी सुरक्षा रक्षक अभिजित दुनघव व आकाश जाधव याांचे हात – पाय बांधून १३ लाख रुपयांचे कॉपर वायर व इतर साहित्याची चोरी झाली होती.

चोरी करणा-या १४ जणांच्या टोळीपैकी १० जणांची ओळख पटविण्यात आली असून यातील चौघांना अटक करण्यात आली. या चोरट्यांचा यापूर्वीही पवनचक्की प्रकल्पांवरून साहित्य चोरीचा इतिहास आहे. बोरखेड (ता. बीड) येथील विज रोहित्र चोरी प्रकरणी नेकनूर, मस्साजोग प्रकल्पावरील कॉपर वायर चोरी प्रकरणी केज व पाटोदा पोलिस ठाण्यातही असाच गुन्हा नोंद असल्याचे समोर आल्याचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.

या टोळीने पवनचक्की प्रकल्पांवरुन कॉपर वायर चोरीची ही चौथी घटना आहे. आरोपींकडून ११ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बबन सरदार शिंदे (वय ४०, रा. नांदूर, ता. केज), धनाजी रावजी काळे (वय २३, रा. वाशी, जि. धाराशिव), मोहन हरी काळे (वय ३०, रा. वाशी, जि. धाराशिव) व लालासाहेब सखाराम पवार (वय २६, रा. दसमेगाव, ता. वाशी, जि. धाराशिव) अशी स्थानिक गुन्हा शाखेने अटक केलेल्यांची नावे आहेत. चौदा जणांच्या टोळीने चोरी केली. यापैकी १० जणांची ओळख पटल्याचे नवनीत कॉंवत म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR