‘हवामान बदलाला पुरुषच जबाबदार’; दिया मिर्झाच्या विधानावरून वादाची ठिणगी

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि पर्यावरणप्रेमी दिया मिर्झा सध्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. हवामान बदल आणि पर्यावरण संकटासाठी पितृसत्ताक व्यवस्थेला जबाबदार ठरवणा-या तिच्या विधानामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. अनेकांनी तिच्या वक्तव्यावर टीका केली असून, त्यानंतर तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

दिया मिर्झा ही अभिनेत्री असण्यासोबतच संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाची गुडविल अ‍ॅम्बेसेडर म्हणूनही कार्यरत आहे. अलीकडेच अभिनेत्री सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झालेल्या दियाने हवामान बदलाच्या मुद्यावर भाष्य केले. यावेळी बोलताना तिने हवामान बदलण्याच्या संकटामागील एक मोठे कारण म्हणजे पितृसत्ताक व्यवस्था असल्याचे म्हटले.

संवादादरम्यान दिया म्हणाली की, हवामान बदलाला चालना देणा-या अनेक निर्णयांमध्ये पुरुषप्रधान व्यवस्थेचा मोठा प्रभाव आहे. त्यावर सोहा अली खानने ‘पुरुषी अहंकार’ हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर प्रतिक्रिया देताना दियाने सांगितले की, जगभरातील अनेक शोषणकारी आणि वर्चस्ववादी व्यवस्था हवामान बदलासाठी जबाबदार आहेत आणि या व्यवस्थांचे नेतृत्व प्रामुख्याने पुरुषांकडे राहिले आहे.

या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर टीकेची झोड उठली. अनेकांनी तिच्या विधानाला पुरुषांविरोधातील भूमिका असल्याचे म्हटले. वाढत्या ट्रोलिंगनंतर दियाने सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट शेअर करत आपला मुद्दा स्पष्ट केला. दिया म्हणाली की, हवामान बदल हे केवळ पर्यावरणीय संकट नसून ते सामाजिक आणि आर्थिक असमानतेशीही जोडलेले आहे. शतकानुशतके निसर्गाकडे केवळ साधन म्हणून पाहण्याच्या वृत्तीमुळे आजची परिस्थिती निर्माण झाली आहे.

ती पुढे म्हणाली की, महिलांना आणि मुलींना हवामान बदलाचे परिणाम सर्वप्रथम आणि सर्वाधिक प्रमाणात भोगावे लागतात. पाणीटंचाई, अन्नसुरक्षेचा प्रश्न, विस्थापन आणि उपजीविकेचे नुकसान यांसारख्या समस्यांचा महिलांवर अधिक परिणाम होतो. मात्र पर्यावरणविषयक निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग अद्यापही मर्यादित आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news