18.7 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रहॉल तिकिटावर जातीचा उल्लेख; भुजबळ, पटोलेंनी दिली प्रतिक्रिया

हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख; भुजबळ, पटोलेंनी दिली प्रतिक्रिया

मुंबई : प्रतिनिधी
दहावी आणि बारावी परीक्षांच्या हॉल तिकिटावर आता थेट जातीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. पहिल्यांदाच बोर्डाच्या परीक्षेच्या हॉल तिकिटावरती जातीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता याबद्दल राजकीय वर्तुळातून देखील याबद्दल टीका केली जात आहे. छगन भुजबळ आणि नाना पटोले यांनी या प्रकरणावरून शिक्षण विभागावर टीका केली आहे.

छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, फुले-शाहू-आंबेडकरांना मानणारे अनेक राज्यकर्ते आहेत. त्यांनी याबाबत लक्ष द्यायला पाहिजे. जसे की आपण शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला आल्यावर जात-धर्म विसरून दर्शन घेत असतो, त्याप्रमाणे रोजच्या व्यवहारात आणि सरकारी व्यवहारात त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी बोलताना दिली आहे.

तर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी देखील या प्रकरणावरून सरकारवर आणि शिक्षण विभागावर निशाणा साधला आहे. सरकारच्या कामकाजावर प्रश्न निर्माण होत आहे. शाळेत प्रवेश घेत असताना कागदपत्रांवर या सगळ्या बाबींचा उल्लेख असतो त्यावरच त्यांचे शिक्षण होते. या पद्धतीने छोट्या जातीचे लोक कोण आहेत? उच्च वर्णीय कोण आहेत? या आधारावर सरकारला परीक्षा घ्यायच्या असतील. त्यातून कमी जातीच्या मुलींना नापास करता येईल का? हा प्रयोग होऊ शकतो.

बोर्ड वेगळे उदाहरण देत आहे, बोर्डामध्ये असे लोक कशाला ठेवता? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच यावर बोर्डाने दिलेल्या स्पष्टीकरणावर बोलताना पटोले म्हणाले की, बोर्ड असे उत्तर देत असेल, तर हे चुकीचे आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात हे कधी झालं नाही. जातिवादी सरकार महाराष्ट्रात आल्याने त्यांना तुकडे पाडायचे असल्याने विद्यार्थ्यांमध्ये हा प्रयोग करत आहे का अशी शंका मनात आहे. नवीन पिढीच्या विद्यार्थ्यांना जात आणि त्या पलीकडे जाऊन शिक्षण घेण्याची सवय झाली आहे. यांच्यातच भेद पाडायचे हे सरकारचे कृत्य असले पाहिजे अशी आमच्या मनात शंका आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR