मुंबई : मुंबईतील बहुमजली इमारतीत आज पहाटे भीषण आग लागली. भायखळा पूर्व येथील घोडपदेव विभागातील म्हाडा संकुलातील न्यू हिंद मिल कपाऊंडच्या ३ सी या २४ मजली इमारतीला आग लागली. आग लागल्यानंतर इमारतीतील १३५ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
तसेच, अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर सकाळी ७.२० मिनिटांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे.
या इमारतीला पहाटे ३.४० मिनिटांनी तिस-या मजल्यावर आग लागली. या इमारतीत मिल कामगार आणि संक्रमण शिबिरातील रहिवासी राहतात.