27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीय‘मिचॉन्ग’ धडकणार

‘मिचॉन्ग’ धडकणार

आंध्रच्या किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा समुद्रकिनारी पुरस्थिती निर्माण

हैदराबाद/ चेन्नई : चक्रीवादळ मिचॉन्ग हे सध्या नैऋत्य बंगालच्या उपसागरावर असून ते हळूहळू दक्षिण आंध्र प्रदेश आणि उत्तर तमिळनाडू किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकरत आहे. दरम्यान, सोमवार दि. ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ‘मिचॉन्ग’ दक्षिण आंध्रप्रदेश आणि उ. तामिळनाडूची किनारपट्टी ओलांडणार आहे. दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर ‘मिचॉन्ग’ धडकणार आहे. दरम्यान तमिळनाडूसह, चेन्नईतील बहुतांशी भागावर चक्रीवादळाचा परिणाम दिसून येत आहे. तामिळनाडू आणि चेन्नईत मुसळधार पाऊस सुरू असून अनेक भागांत पाणी साचल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

चक्रीवादळाच्या प्रभावाखाली आल्याने चेन्नईत मुसळधार पावसामुळे चेन्नई विमानतळावर पाणी साचले आहे. आज रात्री ११ वाजेपर्यंत विमानसेवा पूर्णपणे स्थगित करण्यात आली आहे. काही भागात पुराचे पाणी साचल्याने अनेक गाड्या पाण्याखाली बुडाल्या असल्याचे दृश्य दिसत आहे. दरम्यान चेन्नईत सुरू असलेल्या मुसळधार पावसात २ जणांचा मृत्यू देखील झाला आहे. आंध्र प्रदेशातील काही जिल्ह्यात देखील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्हाधिका-यांनी सतर्कतेचा इशारा देत पुढील २ दिवस सुटी जाहीर केली आहे. पुढील २४ तास आंध्र प्रदेशातील नेल्लोर, गुंटूर, एनटीआर, कृष्णा, पश्चिम गोदावरी, तसेच तिरुपती आणि चित्तूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, वादळी वा-यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

वादळाने केले तीव्र रुप धारण
रविवार दि. ३ डिसेंबर रोजी सायंकाळी नैऋत्य बंगालच्या उपसागरात मिचॉन्ग चक्रीवादळ निर्माण झाले. त्यानंतर या वादळाचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले असून मध्यम स्वरूपाच्या वेगाने ते पुढे सरकत आहे. आज सायंकाळी हे चक्रीवादळ दक्षिण आंध्र प्रदेश आणि उत्तर तमिळनाडूची किनारपट्टी ओलांडणार आहे. याचा प्रभाव तमिळनाडूतील चेन्नईत शहर प्रभावाखाली आहे. कालपासून चेन्नईतील बहुतांशी भागात मुसळधार ते अतिमुसळधार सुरू असून अनेक भागात पावसामुळे पूर आला आहे. मिचॉन्गचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले आहे.

चेन्नईपासून ९० किमी अंतरावर
आज हे चक्रीवादळ चेन्नईपासून सुमारे ९० किमी आणि पुद्दुचेरीपासून २०० किमी अंतरावर होते. चक्रीवादळ आज सायंकाळी ५.३० च्या दरम्यान मच्छलीपट्टणमच्या आग्नेयला ३३० किमी अंतरावर असणार आहे. तसेच मंगळवारी दुपारी मिचॉन्ग चक्रीवादळ नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान दक्षिण आंध्र प्रदेशच्या किना-यावर लँडफॉल होण्याची शक्यता आहे. दरम्यान किनारपट्टीलगत ९०-१०० ते ११० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे असेही हवामान विभागाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR