तुळजापूर : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला आहे. विनोद उर्फ पिंटू गंगणे असे जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीचे नाव आहे.
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीला जाहीर कार्यक्रमात मानाचे पान देण्यात आले आहे. जामिनावर बाहेर असलेल्या या आरोपीने जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. या आरोपीला महसूलमंत्र्यांकडून शाबासकीची थाप मिळाली आहे. तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला १८६५ कोटींचा निधी मंजूर करुन दिला आहे. त्यामुळे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बावनकुळेंचा सत्कार करण्यात आला आहे. सत्काराला भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचीही उपस्थिती होती.
















