23 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्रआमदार प्रकाश सोळंकेंच्या घरावर दगडफेक, गाड्या जाळल्या

आमदार प्रकाश सोळंकेंच्या घरावर दगडफेक, गाड्या जाळल्या

बीड : बीडमधील माजलगावमध्ये आक्रमक मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. तसेच, सोळंकेंच्या बंगल्याच्या आवारात उभ्या असलेल्या गाड्याही मराठा आंदोलकांनी जाळल्या. प्रकाश सोळंकेंनी मनोज जरांगे पाटील याच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मराठा आंदोलक आक्रमक झाले आणि याच्याच निषेधार्थ प्रकाश सोळंकेंच्या घरावर मराठा आंदोलकांनी दगडफेक केली.

सोशल माध्यमांवर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. एका मराठा आंदोलकानं अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंकेंना फोन केला आणि मराठा आरक्षणाबाबत चर्चा सुरू केली. याच ऑडिओ क्लिपमध्ये बोलताना आमदार प्रकाश सोळंकेंनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत वक्तव्य केले होते. याच्याच निषेधार्थ प्रकाश सोळंकेंच्या बंगल्यावर आक्रमक आंदोलकांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. साधारणत: दीड तास आंदोलकांकडून आमदार प्रकाश सोळंकेंच्या घरावर दगडफेक सुरू होती. आंदोलकांनी सोळंकेंच्या बंगल्याच्या आवारात असलेल्या गाड्याही जाळल्या. प्रकाश सोळंकेंच्या बंगल्यातून धुराचे लोळ येत असल्याचे पाहायला मिळत होते. त्यावेळी आमदार प्रकाश सोळंके घरातच उपस्थित होते.

व्हायरल क्लिपमध्ये प्रकाश सोळंके नेमकं काय म्हणालेत?
एक मराठा आंदोलकाने आमदार प्रकाश सोळंकेंना फोन केला आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली. मुदतीचे ४० दिवस संपल्याची आठवण प्रकाश सोळंकेंना मराठा आंदोलकाने करुन दिली. त्यानंतर प्रकाश सोळंके म्हणाले की, कोण म्हटले सरकार आरक्षण देत नाही. ४० दिवस झाले म्हणून काय झाले? हे आरक्षण देऊन कोर्टात अडकवून ठेवायचे का परत? अशी आडमुठी भूमिका घेऊन चालत नाही, शासन देण्याचा प्रयत्न करत आहे. फक्त दिलेले आरक्षण कोर्टात टिकलेह्यााहिजे, एवढंच शासनाचे म्हणणे आहे. त्यादृष्टीनं जे काही आवश्यक आहे, ते सर्व शासन करतंय. शासनानं समिती नेमली आहे, त्या समितीचा अहवाल घेऊन शासन आरक्षण देणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR