30.7 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रसिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती

सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती

मुंबई : सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी शिवसेना (शिंदे गटाचे) आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापुर्वी ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीचे अध्यक्ष होते. त्यांची मुदत २३ जुलैला संपली होती. दरम्यान चार महिन्यांपासून रिक्त असलेल्या पदावर शिंदे गटाचे सरवणकर यांची नियुक्ती केली आहे.

गेल्या गणेशोत्सवात प्रभादेवीमध्ये शिवसेनेच्या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला होता. त्यावेळी हवेत गोळीबार केल्याप्रकरणी सदा सरवणकर अडचणीत सापडले होते. याप्रकरणी सखोल चौकशी झाली. त्यानंतर सदा सरवणकरांना क्लिन चीट देण्यात आली होती.

सदा सरवणकर हे २००४ मध्ये ते पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले होते. २००९ मध्ये मात्र सदा सरवणकरांनी तिकीट नाकारत पक्षाकडून आदेश बांदेकरांना तिकीट देण्यात आलं होतं.

त्यावेळी नाराज झालेल्या सदा सरवणकरांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करत २००९ ची निवडणूक लढवली होती. २०१२ मध्ये सरवणकरांनी काँग्रेसमधून पुन्हा घरवापसी केली. त्यानंतर सर्वात आधी २०१४ मध्ये आणि त्यानंतर २०१९ मध्ये सदा सरवणकर सलग दोन टर्म आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR