17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रअल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग

अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग

मुंबई : वांद्र्यातील एका शाळेतील शिपायाने पाच अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी आरोपी शिपायाविरोधात विनयभंगासह ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
तक्रारीनुसार २ ते ७ नोव्हेंबर या काळात वांद्रे परिसरातील एका शाळेत हा प्रकार घडला.

आरोपीने पाच मुलींसोबत सहामाही परीक्षेच्या काळात आक्षेपार्ह संभाषण केले. तसेच त्याने मोबाईलद्वारे दूरध्वनी करून, तसेच इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे या मुलींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दुहेरी अर्थाच्या शब्दांचा वापर करून तो संवाद साधत होता.

याप्रकरणी वांद्रे पोलिसांना तक्रार आल्यानंतर विनयभंग व पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुली १४ ते १६ वर्षे वयोगटातील असून त्यांनी याबाबत शाळा प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यानंतर शाळा व्यवस्थापकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपीच्या गैरवर्तनाचे सीसीटीव्ही कॅमे-यातील चित्रीकरण पोलिसांना मिळाले आहे. त्याच्या आधारावर पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपीला अटक केली. अटक आरोपी भाईंदर येथील रहिवासी आहे. त्याने अशा प्रकारे इतर मुलींसोबतही गैरवर्तन केले आहे का, याबाबत पोलिस तपास करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR