22.2 C
Latur
Thursday, January 30, 2025
Homeमहाराष्ट्र४० लाखांत एमपीएससीचा पेपर?

४० लाखांत एमपीएससीचा पेपर?

पेपर आदल्या दिवशी देऊ विद्यार्थ्यांना आलेल्या कॉल्सने सर्वत्र खळबळ

पुणे : ‘नमस्कार सर, महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा येत्या २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या परीक्षेचा पेपर आम्ही आपणास उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप कॉलवर एक मिटिंग करावी लागेल. त्यानंतर ठरल्याप्रमाणे होईल, त्यासाठी ४० लाख रुपये द्यावे लागतील. अशाप्रकारे विद्यार्थ्यांना आमिष दाखवणारे कॉल्स काही विद्यार्थ्यांना आल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याची गंभीर दखल घेतली असून आयोगाने पुण्याच्या पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ या परीक्षेसाठी असणारी प्रश्नपत्रिका आदल्या रात्री उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थ्यांना आमिष दाखवणारे फोन करण्यात आले आहेत. एकाच विद्यार्थ्याला अजून दुसरा कॉल आला. त्यात आपण ‘गट ब’च्या परीक्षेसाठी अर्ज केला आहे. आपण या पदाची तयारी करत आहात. तर आपल्यासाठी एक ऑफर आहे. आम्ही या परीक्षेची प्रश्नपत्रिका २ फेब्रुवारी पूर्वी उपलब्ध करून देणार आहोत.

त्यासाठी ४० लाख रुपये द्यावे लागतील. आपल्याला विश्वास नसेल तर या परीक्षेला एक ही रुपया नाही दिला तरी चालेल. फक्त आपली मूळ कागदपत्रे जमा करावे लागतील. त्यानंतर मुख्य परीक्षेला देखील प्रश्नपत्रिका दिली जाईल. असे एका पुरुषाच्या आवाजातील संभाषण रेकॉर्ड झालेलं आहे. या संबंधित विद्यार्थ्याने तुम्ही माझे मित्र तर नाही ना, की उगाच मस्करी करत आहात, अशीही विचारणाही केली. ‘तर मी तुमचा कोणी मित्र नाही, तुमची तयारी असेल, नोकरी हवी असेल तर सांगा पुढची प्रक्रिया करूयात. तुमची सर्व माहिती आमच्याकडे आहे. फक्त या फोन कॉलबद्दल कोणाला काही बोलू नका असे सांगितले.

या फोन कॉलमुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नोकर भरतीत मोठा घोटाळा होणार असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. तसेच प्रामाणिकपणे अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR