22.8 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeउद्योग३ वर्षानंतर मुकेश अंबानी स्वस्त पेट्रोल-डिझेलचे देणार गिफ्ट

३ वर्षानंतर मुकेश अंबानी स्वस्त पेट्रोल-डिझेलचे देणार गिफ्ट

नवी दिल्ली : आशियातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी हे तीन वर्षात जे झाले नाही, ते घडवून आणणार आहेत. त्यांच्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलची स्वस्ताई येऊ शकते.

डिसेंबर महिन्यात ५ राज्यांच्या निवडणूका पार पडल्या. त्यावेळी पेट्रोलियम मंत्रालयाने एक निर्णय घेतला. त्यानुसार, ज्या देशांवर निर्बंध नाहीत, अशा कोणत्याही देशाकडून भारत कच्चे तेल आयात करु शकतो. त्यामुळे व्हेनेझुएला या देशाकडून तीन वर्षानंतर कच्चे तेल खरेदी करण्याची आशा पल्लवित झाली आहे. २०१९ मध्ये या देशावर निर्बंध घालण्यात आले होते. ते हटल्यानंतर आता कच्चे तेल खरेदीचा निर्णय होऊ शकतो. कमोडिटी मार्केट एनालिटिक्स फर्म केपलर नुसार, सर्वात शेवटी व्हेनेझुएलाकडून भारताला नोव्हेंबर २०२० मध्ये कच्चा तेलाची खेप पाठविण्यात आली होती.

मुकेश अंबानी यांचा थेट संपर्क

डिसेंबर २०२३ च्या सुरुवातीला व्हेनेझुएलाकडून कच्चे तेल खरेदी करण्याचा सौदा होऊ शकतो हे स्पष्ट झाले होते. मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज त्यासाठी थेट सौदा करणार असल्याचे समोर आले होते. कंपनीने या देशाकडे सध्या ३ टँकर कच्चे तेल खरेदीची बुकिंग केली आहे. जानेवारी २०२४ पासून हे कच्चे तेल भारतात यायला सुरुवात होईल. रिलायन्स इंडस्ट्रीजपूर्वी नयारा एनर्जी पूर्वीपासूनच व्हेनेझुएलाकडून कच्चा तेलाची खरेदी नियमीतपणे करत होती. आता ही खेप आल्यानंतर देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात होण्याची दाट शक्यता आहे.

रशियाकडून स्वस्त कच्चा तेलाचा पर्याय

भारत सध्या रशियाकडून सवलतीत कच्चा तेलाची आयात करत आहे. पण आता ही सवलत केवळ २ डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आहे. तर व्हेनेझुएलाकडून देशाला ८ ते १० डॉलर प्रति बॅरलपर्यंत स्वस्तात कच्चे तेल मिळू शकते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR