21.2 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रदेवीच्या दर्शनासाठी नेत बायकोचा खून

देवीच्या दर्शनासाठी नेत बायकोचा खून

सातारा : पत्नीला देवदर्शनाच्या बहाण्याने सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी परिसरात नेऊन खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीला दरीत ढकलल्यानंतर ती झाडात अडकली. त्या वेळी तरुणाने साडीने तिचा गळा आवळून खून केला. तरुणाला लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे.

ललिता अमोलसिंग जाधव (वय ३६, रा. भैरवनाथ मंदिराजवळ, फुलगाव, ता. हवेली) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती अमोलसिंग मुरली जाधव याला अटक करण्यात आली आहे.

पोलिस हवालदार प्रताप नारायण आव्हाळे यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोलसिंगने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. त्यानंतर पोलिसांना तपासात महत्त्वाची माहिती मिळाली. चौकशीसाठी अमोलसिंगला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने पत्नीच्या खुनाची कबुली दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR