हैदराबाद : राजस्थान विधानसभेसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यानंतर तेलंगणा विधानसभेसाठी मतदान होईल. तेलंगणाची लोकसंख्या साधारण साडेतीन कोटी इतकी आहे.
तेलंगणामध्ये मुस्लिम समाजाची लोकसंख्या १३ टक्के इतकी आहे. राजकीय जाणकारांच्या आकलनानुसार राज्यातल्या ११९ जागांपैकी एक तृतीअंश जागांवर मुस्लिमांची मते प्रभाव टाकतात. म्हणजे तेलंगणातील ४६ जागांवर मुस्लिम मतदारांचे मतदान निर्णायक ठरते. तेलंगणा निवडणुकीत उतरलेल्या पक्षांची मुख्य लढत बीआरएससोबत असली तरी काँग्रेस आणि भाजपने ज्या पद्धतीने राजकीय वातावरण केले आहे, त्यावरुन इतर राज्यात आणि लोकसभा निवडणुकीतदेखील त्याचे परिणाम दिसून येतील.
भाजपने तेलंगणामध्ये जाहीरपणे मुस्लिमांचे चार टक्के आरक्षण काढून घेण्याची घोषणा केली. तर काँग्रेसने एम फॅक्टरच्या माध्यमातून मोठी खेळी केल्याचे दिसून येत आहे. राजकीय विश्लेषक सांगतात की, राज्यात निवडणुकीचा निकाल काहीही येवो परंतु एम फॅक्टरच्या अनुषंगाने देशातल्या वेगवेगळ्या राज्यांत तेलंगण निवडणुकीचा प्रभाव पडेल.