24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रप्रत्येक जिल्ह्यात 'नमो ११ कलमी कार्यक्रम' प्राधान्याने राबवावा : मुख्यमंत्री शिंदे

प्रत्येक जिल्ह्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ प्राधान्याने राबवावा : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होण्यासाठी आणि लोकोपयोगी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ प्रत्येक पालकमंत्र्यांनी प्राधान्याने राबवावा. शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून राज्याच्या विकासाला गती द्यावी असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मंत्रालयातील मंत्रिमंडळ बैठक सभागृह येथे, मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रमाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीव्दारे शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री मुंबई उपनगर मंगलप्रभात लोढा यासह मंत्रीमंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते. मुंबई उपनगर मधील आमदार मंगेश कुडाळकर, दिलीप लांडे, अमित साटम, प्रकाश सुर्वे, आशिष शेलार, मिहिर कोटेचा, पराग शहा, अतुल भातखळकर, पराग अळवणी, मुंबई उपनगरमधील लाभार्थ्यी दूरदृश्यप्रणालीव्दारे कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, दिपावली सण जवळ आला आहे. सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा, मुंबई उपनगर मध्ये ‘नमो ११ कलमी कार्यक्रमाचा शुभारंभ करताना आनंद होत आहे.शासनाच्या सर्व योजना सर्व घटकापर्यंत पोहोचतील यासाठी आपले शासन प्रयत्नशील असून.आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रत्येक घटकाच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर राज्याच्या विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे देखील पाठींबा मिळत आहे. हेच लक्षात घेवून राज्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. आम्ही सत्तेत आल्यापासून अनेक लोकहिताचे निर्णय घेतले आहेत.’शासन आपल्या दारी’ हा उपक्रम प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवत आहोत दीड कोटी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलो आहोत.या उपक्रमाच्या माध्यमातून विकास होण्यास मदत मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, हे शासन शेतक-यांच्या पाठिशी असून आपत्तीच्या काळात नियम बाजूला ठेवून आतापर्यंत दिलेली मदत ही आतापर्यंत दिलेली सर्वात अधिक मदत आहे.शेतक-यांना शासनाचे अनेक प्रकल्प सुरू केले. पीक विमा योजना,प्रधानमंत्री नमो सन्मान योजना यासारख्या योजना राबविल्या. आरोग्य, शिक्षण, उद्योग, शेतकरी, महिला, कामगार, दिव्यांग, मागासवर्ग घटक अशा सर्व घटकांचा सर्वसमावेशक विकास करण्यासाठी आपले शासन कटिबध्द असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ हा सर्व घटकांना न्याय देणारा उपक्रम असून मुंबई उपनगरमध्ये हा उपक्रम सुरू झाला त्याच धर्तीवर राज्यातही प्रभावीपणे राबविण्याचे त्यांनी सांगितले.

समाजातील सर्व घटकांना लाभ होईल: उपमुख्यमंत्री फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,’नमो ११ कलमी’ कार्यक्रमातून सर्व समाज घटकांसाठीच्या योजना प्रभावी पणे राबवा.आज मुंबई उपनगरमध्ये हा उपक्रम सुरू होत आहे याचा अत्यंत आनंद आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या अनेक महत्वपूर्ण निर्णयामुळे देशाला जगातील पाचव्या स्थानावर नेले आहे त्याच धर्तीवर राज्यातही सर्व घटकांचा विकास करून राज्याला विकासाच्या पथावर नेण्याचा मानस या उपक्रमातून आपण साध्य करत आहोत आज मुंबई उपनगरमध्ये सुरू होत असलेल्या या उपक्रमाला शुभेच्छा देतो.कामगार,महिला तसेच समाजातील इतर घटकांना विकासाच्या समान संधी उपलब्ध होण्यासाठी हा उपक्रम निश्चीत मदत करेल.प्रत्येक घटकाचे जीवनमान उंचावण्यासाठी नमो कलमी ११ कलमी कार्यक्रम निश्चीत मोलाची भूमिका बजावेल असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. त्याचा आज मुंबई उपनगर जिल्ह्यात शुभारंभ करत आहोत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विचारानुसार समाजातील शेवटच्या घटकाचा विकासावर आधारित अनेक जनहितार्थ निर्णय त्यांनी घेतले आहेत त्याच विचारांवर आधारित सर्वात शेवटच्या घटकापर्यत शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यापर्यंत पोहोचवणार आहोत.आज मुंबई उपगनरातील ११ ठिकाणी वेगवेगळया ठिकाणी हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. आज सुरू झालेला हा उपक्रम असाच पुढे सुरू ठेवून प्रत्येक घटकाला शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.बृहन्मुंबई महापालिका आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्माने स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या सहकार्यातून ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’यशस्वीपणे राबविणार आहोत असेही मंत्री लोढा म्हणाले.

बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून हा नमो ११ कलमी कार्यक्रमांतर्गत नमो दिव्यांग शक्ती अभियान- मुलुंड,नमो कामगार कल्याण अभियान -चांदिवली,नमो आत्मनिर्भर ग्राम अभियान- वांद्रे (पश्चिम),नमो दलित सन्मान अभियान- घाटकोपर (पूर्व) ,नमो तीर्थ स्थळ सुधार अभियान- विलेपार्ले (पूर्व), नमो आदिवासी स्मार्ट स्कूल अभियान- मागाठाणे- बोरीवली (पूर्व),नमो क्रीडा मैदान आणि उद्यान अभियान मालाड (पश्चिम),नमो सौर ऊर्जा कार्यालय अभियान- वांद्रे (पूर्व),नमो शेत तळे अभियान अंधेरी (पश्चिम),नमो शहर सौंदर्यीकरण अभियान- कांदिवली (पूर्व),नमो महिला सशक्तीकरण अभियान- कुर्ला (पूर्व) येथे विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या योजनेमधून बचत गटाना अर्थिक मदत, कामगारांना सुरक्षा संचाचे वाटप करणे, पात्र महिला मच्छिमार महिला लाभार्थ्यांना शीतपेट्ट्यांचे वाटप,महिला बचत गटांच्या सेंद्रीय उत्पादनासाठी विशेष बाजारपेठ भरविणे,जिल्हाधिकारी कार्यालय येथे सौरऊर्जा प्रकल्पाचे उदघाटन,आदिवासी विद्यार्थ्यांसाठी साहित्य वाटप ,दिव्यांगाना इलेक्ट्रीक साहित्याचे वाटप, माता रमाबाई आंबेडकरनगर येथे गंधकुटीर समाजकल्याण केंद्राचे भुमिपूजन , अंबोजवाडी, मालवणी येथे क्रीडा मैदानाचे भूमीपूजन, पार्लेश्वर मंदिराच्या परिसराच्या सुशोभिकरणाच्या कामाचे भूमीपूजन असे विविध कार्यक्रम पार पडले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR