गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नांदेड पोलिसांची कठोर कारवाई

नांदेड : प्रतिनिधी
जिल्ह्यातील सक्रिय व वारंवार गुन्हे करणा-या सराईत गुन्हेगारांविरुद्ध नांदेड पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत चार सराईत गुन्हेगारांना महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व व्हिडिओ पायरेट्स यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम (एमपीडीए) अंतर्गत एक वषार्साठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी जिल्ह्यातील गुन्हे अभिलेखावर असलेल्या सक्रिय व सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित करून, त्यांच्या विरोधात प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानूसार स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड व प्रतिबंधक कार्यवाही सेल यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्याकडे काही सराईत गुन्हेगारांचे प्रस्ताव सादर केले. त्यानंतर प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांच्याकडे पाठविण्यात आला. स्थानबद्ध करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये चंद्रशेखर ऊर्फ परश्या दिलीप ओढणे (वय २५, रा. संघसेननगर, नांदेड), भैयासाहेब बालाजी बुद्धे (वय २२, रा. आंबेडकरनगर, नांदेड), चंर्द्या ऊर्फ चंद्या देवराव पाईकराव (वय २८, रा. संघसेननगर, नांदेड) आणि रोशन सुरेश हाळदे (वय २५, रा. आंबेडकरनगर, ता. लोहा, जि. नांदेड) यांचा समावेश आहे.

या आरोपींविरुद्ध दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणे, घातक हत्यारांनी इच्छापूर्वक दुखापत करणे यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद पोलीस अभिलेखावर आहे. यापूवीर्ही त्यांच्याविरुद्ध विविध प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांच्या वर्तनात अपेक्षित सुधारणा न झाल्याने त्यांच्याविरुद्ध एमपीएडी कायद्यांतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव सादर करण्यात आला.

सदर प्रस्तावावर सुनावणी व आवश्यक कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांनी २६ सप्टेंबर २०२६ रोजी संबंधित चारही गुन्हेगारांना एक वर्षाच्या कालावधीसाठी मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले. या आदेशाची अंमलबजावणी करून संबंधित चारही गुन्हेगारांना ताब्यात घेऊन कारागृहात दाखल करण्यात आले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Illegal Moneylending Case | अवैध सावकारीविरोधात गुन्हा दाखल | Latur News | Ekmat Digital
01:52
Video thumbnail
Latur Railway Coach Factory | स्थानिक युवकांना रोजगार कधी? | Latur News | Ekmat Digital
03:12
Video thumbnail
माहूरजवळ भीषण अपघात | एकाचा मृत्यू, चार गंभीर जखमी | Nanded News Today
02:03
Video thumbnail
Latur|समान वेतनासाठी सेवानिवृत्त कर्मचारी आक्रम;कवेतनातील तफावत कधी मिटणार?
06:30
Video thumbnail
Nanded Sand Mafia Action | आठ बोटी ब्लास्ट करून नष्ट | LCB Raid | Nanded News
00:48
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये १४.४८ लाखांचा गुटखा जप्त | बोलेरोसह मुद्देमाल ताब्यात | Latur News
01:42
Video thumbnail
'गोविंदा' अन् 'उदो उदो'च्या जयघोषात अंबाबाईला तिरुपती देवस्थानचा मानाचा शालू अर्पण
00:56
Video thumbnail
Maharashtra Drought|५ हजारांत दुष्काळ मिटणार? शेतकऱ्यांची बोळवण? | मुद्दा महाराष्ट्राचा
47:58
Video thumbnail
Latur Traffic Police|आईच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांना वाहतूक शाखेचे सुरक्षा कवच!
02:17
Video thumbnail
५ हजार मदत म्हणजे क्रूर थट्टा; दुष्काळग्रस्तांना १ लाख रुपयांच्या मदतीची शेतकरी संघटनांची मागणी.
10:59
Video thumbnail
Parbhani|परभणीत न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन!
03:58
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये ५५ वर्षीय महिलेच्या खुनाचा उलगडा; २४ तासांत संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
02:49
Video thumbnail
DCC BANK ELECTION|पक्षीय राजकारण बाजूला! सहकारमंत्री बाबासाहेब पाटील धिरज देशमुखांसोबत
04:38
Video thumbnail
Nanded|कंधारमध्ये मध्यरात्री कार मन्याड नदीत कोसळली; महिलेचा दुर्दैवी मृत्यू
01:37
Video thumbnail
Nanded|माहूरच्या केरोळी घाटात भीषण अपघात! टेम्पो दरीत कोसळून दोघांचा मृत्यू, चार जण गंभीर
01:10

Latest news