24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयनरेश गोयल यांची ५३८ कोटींची संपत्ती जप्त

नरेश गोयल यांची ५३८ कोटींची संपत्ती जप्त

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेडशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात ५३८ कोटी रुपयांहून अधिकची मालमत्ता जप्त केली आहे. या मालमत्तांमध्ये जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल, पत्नी अनिता गोयल आणि मुलगा निवान गोयल यांच्यासह लंडन, दुबई आणि भारतातील विविध राज्यांमधील कंपन्या आणि व्यक्तींच्या नावावर नोंदणीकृत १७ निवासी सदनिका, बंगले आणि व्यावसायिक इमारतींचा समावेश आहे.

केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ अंतर्गत किमान ५३८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. नरेश गोयल यांच्याशिवाय जेटएअर प्रायव्हेट लिमिटेड आणि जेट एंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेडच्या नावावर काही मालमत्ता नोंदणीकृत आहेत. कॅनरा बँकेने दाखल केलेल्या कथित फसवणूक प्रकरणात ईडीने मंगळवारी नरेश गोयल आणि इतर पाच जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. बँकेने एफआयआरमध्ये जेट एअरवेजला ८४८ कोटी रुपयांपर्यंतची क्रेडिट मर्यादा आणि कर्ज मंजूर केल्याचा आरोप केला आहे. त्यापैकी ५३८ कोटी रुपये थकीत आहेत. नरेश गोयल यांना ईडीने १ सप्टेंबर रोजी पीएमएलए अंतर्गत अटक केली होती. त्यांना मुंबईतील आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले आहे.

नरेश गोयल यांनी इतर देशांमध्ये ट्रस्ट तयार करून पैशांची उधळपट्टी केल्याचा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने केला आहे. नरेश गोयल यांनी या ट्रस्टचा वापर करून स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप आहे. त्या ट्रस्टचे पैसे हे गुन्ह्यातून मिळालेले पैसे नसून दुसरे काही असल्याचे ईडीने म्हटले आहे. एका ऑडिट अहवालाचा हवाला देत अंमलबजावणी संचालनालयाने म्हटले आहे की, जेट एअरवेजकडून घेतलेल्या कर्जाचा वापर मालमत्तेव्यतिरिक्त फर्निचर, कपडे आणि दागिने खरेदी करण्यासाठी केला गेला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR