24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeसोलापूरनाशिक पोलिसांचे पुन्हा मिशन सोलापूर; कोट्यवधींचा माल जप्त

नाशिक पोलिसांचे पुन्हा मिशन सोलापूर; कोट्यवधींचा माल जप्त

सोलापूर : नाशिकचे ड्रग्ज प्रकरण उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाचे मुंबई पोलिसांसह पुणे पोलीस, नाशिक पोलीस कसोशीने तपास करत आहेत. सोलपूरमधून नाशिकला ड्रग्ज पुरवठा होत असल्याचे समोर आल्यानंतर नाशिक पोलिसांनी सोलापूरमध्ये जात ड्रग्जचा कारखाना उध्वस्त केला. आता नाशिक पोलिसांनी पुन्हा मिशन सोलापूर हाती घेतले असून याच कारखान्याच्या शेजारील भागात असलेले एमडी बनविण्यासाठी लागणारे साहित्य आणि रसायनाचे गाेडाऊन पाेलिसांनी शाेधून काढत उद्धवस्त केले आहे. तसेच कोट्यवधींचा माल जप्त करण्यात आला आहे.

सोलापूर औद्योगिक वसाहतीत धाड टाकून एमडी (मॅफेड्रॉन) तयार हाेणाऱ्या कारखाना सील करण्यात आला होता. सामनगाव एमडी प्रकरणातील संशयित सनी पगारे याने सोलापुरात सुरू केलेला एमडीचा कारखाना नाशिक अमली पदार्थ विरोधी पथक (एनडीपीएस) आणि गुन्हे शोध युनिट एकच्या पथकाने २७ ऑक्टोबर रोजी उद्ध्वस्त केला. तेथून दहा कोटी रुपयांच्या एमडीसह कोट्यवधी रुपयांचा कच्चा माल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणात नाशिकचा मनोहर काळे या संशयिताला पोलिसांनी २८ ऑक्टोबर रोजी अटक केली. कारखान्यासाठी लागणारा कोट्यवधी रुपयांचा कच्चा माल एका गोदामात होता. ही माहिती मिळताच गुन्हे शाखेची संयुक्त पथके सोलापुरात दाखल झाली व गोदामात धाड टाकून मुद्देमाल हस्तगत केला.

ड्रग्ज तस्करांवर माेक्का
पुणे पोलिसांनी ललित पाटीलच्या ड्रग्ज तस्कर टोळीला एमडी प्रकरणात ‘मोक्का’ कायदा लावला आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांनीही सनी पगारे, पिवाल गँगवर माेक्का लावण्याची तयारी सुरु केली आहे. आतापर्यंत सामनगाव एमडी प्रकरणात दहा संशयितांना पोलिसांनी अटक केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR