33.2 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रअमली पदार्थ तस्करी प्रकरणात दोन पोलिस बडतर्फ

अमली पदार्थ तस्करी प्रकरणात दोन पोलिस बडतर्फ

पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील ससून रुग्णालयातून पसार झाल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन पोलिस कर्मचा-यांना पोलिस दलातून बडतर्फ करण्याचे आदेश देण्यात आले. नाथा काळे आणि अमित जाधव अशी बडतर्फ केलेल्या पोलिस कर्मचा-यांची नावे आहेत.

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पसार झाल्याप्रकरणी आतापर्यंत एक सहायक पोलिस निरीक्षक, दोन उपनिरीक्षक आणि सात पोलिस कर्मचा-यांना पोलिस दलातून निलंबित करण्यात आले आहे.

ललित पसार झाल्याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून ससूनमधील वॉर्डमध्ये बंदोबस्तास असलेले पोलिस कर्मचारी काळे आणि जाधव यांना नुकतीच अटक करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशाने दोघांची येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. काळे आणि जाधव यांनी पोलिस दलाची प्रतिमा मलिन केली, तसेच गंभीर स्वरूपाची शिस्तभंग आणि बेजबाबदार वर्तन केल्याचा ठपका ठेवून दोघांना पोलिस दलातून बडतर्फ करण्याचे आदेश देण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR