36.3 C
Latur
Friday, April 18, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात लवकरच नवी सर्किट ट्रेन

राज्यात लवकरच नवी सर्किट ट्रेन

मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वेव्ह्स समिट २०२५ हजेरी लावली. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंट या ठिकाणी ‘वेव्ह्स समिट २०२५’ पार पडत आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव विविध ऑडिटोरिअम्सची पाहणी केली.

या पाहणीनंतर त्यांनी एकत्र पत्रकार परिषद महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांबाबत मोठमोठ्या घोषणा केल्या. महाराष्ट्रात १ लाख ७३ हजार कोटींची कामे सुरू आहेत. यात मुंबईसह इतर परिसरात १७ हजार कोटींची कामे सुरू आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुंबईतील अनेक रेल्वे प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत. राज्यातील १३२ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. महाराष्ट्रासाठी १ लाख ७३ हजार कोटीचे रेल्वे प्रकल्प उभारले जाणार आहेत. यावर्षी जवळपास २४ हजार कोटी राज्याला मिळाले आहेत. राज्यात छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरु करणार आहे. या सर्किट ट्रेनने राज्यातील ऐतिहासिक स्थळांना भेट देता येणार आहे. सर्किट ट्रेनने १० दिवस प्रवास करता येणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विदर्भाचा छत्तीसगड-तेलंगणासोबतचा व्यवहार वाढणार आहे. गोंदिया बल्लारशा रेल्वे लाईनचा दुहेरीकरण याकरता ४८१९ कोटी रुपये हे केंद्र सरकारने या ठिकाणी दिलेले आहेत आणि यामुळे निश्चितपणे जो विदर्भाचा भाग आहे. त्याला एक मोठा फायदा होणार आहे. विशेषत: छत्तीसगड आणि तेलंगणाचा जो व्यापार आहे व्यवहार आहे हा विदर्भाचा वाढण्याच्या दृष्टीने ही एक अत्यंत महत्त्वाचे नाही, कारण आपल्याला माहिती आहे की गोंदिया अशा ठिकाणी आहे की जिथे मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या दोघांची बॉर्डर आहे आणि पलीकडे बल्लारशापासने तेलंगणा आणि तिकडे आंध्र प्रदेश आपल्याला मिळतो. त्यामुळे अतिशय स्ट्रॅटेजीक अशा प्रकारची ही जी लाईन आहे असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

१३२ स्टेशनचा विकास केला जाणार
विशेषत: १३२ स्टेशन्स महाराष्ट्रातील केंद्र सरकारने रेल्वे मिनिस्ट्री डेव्हलपमेंट करता घेतलेली आहे. त्यामध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस देखील आहे आणि महाराष्ट्रातले जवळजवळ सगळे महत्त्वाचे स्टेशन. १ लाख ७३ हजार कोटी रुपये हे रेल्वे बजेटमध्ये आपल्याला मिळालेले आहेत आपण जर बघितले तर यूपीएच्या दहा वर्षात दहा हजार कोटी रुपये देखील एकत्रितपणे दहा वर्षात मिळालेले नाही, अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज सर्किट
छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हे देखील या ठिकाणी सुरू होणा-या ज्याच्यामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारची हायकोलीक रेल्वे दहा दिवसांचा टूर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जी काही विविध महत्त्वाचे किल्ले आहेत किंवा जागा आहेत आणि अर्थातच त्याच्याशी संबंधित इतर जे काही आपले सांस्कृतिक स्थळ आहेत याला जोडणारा येथील सुरुवात ही रेल्वे विभाग त्या ठिकाणी करतो आहे असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR