24.1 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रनिलेश लंकेंच्या अडचणीत वाढ

निलेश लंकेंच्या अडचणीत वाढ

अहमदनगर : महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यासाठी महाविकास आघाडीचे दिग्गज नेते कामाला लागले आहेत. स्वत: शरद पवार यांनी लंकेंसाठी सभा घेत एका सर्वसामान्य शेतक-याच्या पोराला निवडून देण्याचे आवाहन केले. तर, महायुतीचे उमेदवार सुजय विखेंना निलेश लंकेंचे तगडे आव्हान मिळाल्याने येथील निवडणूक चांगलीच चर्चेत आहे. त्यातच, आता पंतप्रधान नरेंद्र मोदीही विखे पाटील यांच्यासाठी प्रचारसभा घेणार आहे. त्यामुळे, लंकेंच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी महायुतीही जोमाने काम करत आहे. त्यातच, लंके यांनी पोलिसांना उद्देशून केलेल्या विधानामुळे आता ते अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, निलेश लंके यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अहमदनगर दक्षिण लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेकडून करण्यात आली आहे. संघटनेने निवडणूक आयोग आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे. निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर एका भाषणात बोलताना निलेश लंके यांनी पोलिसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. कार्यकर्त्यांवरती कारवाई झाल्यानंतर निलेश लंके यांनी भाषणादरम्यान इथे पोलिस विभागातील कोणी असेल तर संबंधित पीआयला सांगा तुमचा बाप दहा मिनिटात तिथे येतोय असे विधान केले होते. निलेश लंकेंच्या या विधानावरुन आता महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटना आक्रमक झाली असून पोलिसांचा बाप काढणा-या निलेश लंके यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच, निलेश लंके यांच्या वक्तव्याचा पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR