27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeपरभणीडॉ. विद्या चौधरी कार अपघातातून बचावल्या

डॉ. विद्या चौधरी कार अपघातातून बचावल्या

परभणी : परभणी शहरातील स्त्री रोग व प्रसुती तज्ञ तथा भाजपाच्या नेत्या डॉ. विद्या चौधरी यांच्या कार परभणी-जिंतूर रस्त्यावरील जलालपूर पाटी जवळ रविवार, दि.१७ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता गाडी समोर आलेले रानडुक्कर वाचवण्याच्या प्रयत्नात पलटी खावून खड्डयात जावून पडल्याची घटना घडली. या कारमध्ये ३ जण प्रवास करत होते. या अपघातात कार मधून प्रवास करणा-या कुणालाही दुखापत झालेली नसून डॉ. चौधरी यांच्यासह चालक व अन्य एक जण सुखरूप असल्याचे समजते.

भाजपाच्या नेत्या तथा डॉ. विद्या चौधरी या आपली कार क्रमांक एमएच २२ बीसी १९२३ मधून रविवारी सकाळी परभणी येथून जिंतूरकडे जात होत्या. परभणी- जिंतूर रस्त्यावरील जलालपूर पाटी जवळ त्यांच्या गाडी समोर अचानक रानडुक्कर आले.

या रान डुकराला वाचवण्याचा प्रयत्न करताना गाडी रोडच्या बाजूला मोठ्या खड्ड्यात जावून पडली. परंतू सुदैवाने या अपघातात कारमधील कोणालाही दुखापत झाली नाही. डॉ. चौधरी यांच्या गाडीला अपघातात झाल्याचे वृत्त समजताच नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. या कारमधील डॉ. चौधरी यांच्यासह चालक व अन्य एक असे सर्व जण सुखरूप असल्याने चौधरी कुटुंबियांसह नागरीकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR