39.6 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeराष्ट्रीयनितीशकुमार यांना कमी जागा मिळणार

नितीशकुमार यांना कमी जागा मिळणार

पाटणा : राजद आणि काँग्रेसच्या सोबतच्या महागठबंधनमधून बाहेर पडून जदयूचे अध्यक्ष नितीशकुमार पुन्हा एनडीएत गेले आणि नवव्यांदा मुख्यमंत्री बनले. नितीशकुमारांनी नवे सरकार स्थापन केल्यानंतर एक महिना झाल्यावरही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. नितीशकुमारांची लोकसभेसोबत विधानसभा निवडणुकीच्या मागणीला भाजपकडून रेड सिग्नल दाखवण्यात आला आहे. बिहारमधील जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू आहेत. महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही भाजप एनडीएतील मोठा भाऊ ठरणार असल्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्रात भाजप ४८ पैकी ३४ जागा लढवणार असल्याच्या चर्चा आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारांची २२ ची मागणी होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्यासमोर १३ जागांची मागणी केली. आता प्रत्यक्ष जागावाटपात त्यांच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे बिहारमध्येही जदयूचे १६ खासदार आहेत. आता त्यांना कमी जागा मिळण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा आहेत. त्यापैकी भाजप २० ते २२ जागा लढवण्याची शक्यता आहे. दुसरीकडे नितीशकुमार यांच्याकडे १२-१४ जागा जाणार अशी शक्यता आहे. लोकजनशक्ती पार्टीत दोन गट पडले आहेत, त्यांना चार-चार जागा मिळण्याची शक्यता आहे.

पशुपती पारस आणि चिराग पासवान यांच्या पक्षांना ८ जागा मिळण्याची शक्यता आहे. रामविलास पासवान यांच्या निधनानंतर लोक जनशक्ती पार्टीत दोन गट पडले होते. पशुपती पारस आणि चिराग पासवान या दोन्ही गटांना समान जागा मिळणार की वेगवेगळ््या जागा मिळणार, हे पाहावे लागेल. बिहारमधील एनडीएचे घटक पक्ष उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक समता पार्टी आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाच्या जीतन राम मांझी यांच्या पक्षाला एक जागा मिळेल, अशी शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR