36.3 C
Latur
Saturday, April 19, 2025
Homeसंपादकीय विशेषकोई सरहद ना इन्हे रोके .....

कोई सरहद ना इन्हे रोके …..

  • अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (३ ते ७ जानेवारी) पटकथा लेखक, गीतकार जावेद अख्तर यांना ‘पद्मपाणी’ जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे, त्यानिमित्त त्यांच्या कार्याला अधोरेखित करणारा धावता आढावा…

चित्रपटाच्या नायकाइतके मानधन लेखकाला मिळायला हवे. चित्रपटाच्या पोस्टरवर नायक, नायिकेच्या नावाप्रमाणे लेखकाचे नाव ठळकपणे लिहावे यासाठी असाध्य ते साध्य करून दाखवणारे ‘जंजीर’, ‘दीवार’, ‘शोले’, ‘डॉन’सारख्या सुपरहिट चित्रपटांच्या कथा लिहिणा-या जोडगोळीतले लेखक म्हणून जावेद अख्तर यांची कारकीर्द उल्लेखनीय आहे. सलीम-जावेद यांनी चार दशकांपूर्वी लिहिलेले चित्रपट आजही प्रेक्षक आवडीने बघतात. त्यांची चित्रपटगीते ऐकताना आबाल-वृध्द तल्लीन होऊन जातात. तीन पिढ्यांचा प्रदीर्घ साहित्य वारसा त्यांना लाभलेला आहे. जानिसार आणि साफिया अख्तर यांच्या पोटी दोन अपत्ये जन्मली, त्यातले थोरले पुत्र जावेद यांचा जन्म १७ जानेवारी १९४५ सालचा. जानिसार यांनी पत्नी साफियांशी निकाह होताना एक नज्म लिहिली होती. ‘लम्हा लम्हा किसी जादू का फसाना होगा…’ लग्नानंतर आपल्या आयुष्यात प्रत्येक वळणावर जादूसारखी एकेक घटना घडेल अशा आशयाच्या आशावादी ओळीत जादू शब्दाचा वापर कुशलतेने केला होता. हा जादू शब्द त्यांना खूप भावला. आपल्या पहिल्या अपत्याचे नाव आपण जादू हेच ठेवावे असा त्यांनी निर्णय घेतला. जादू या नावानेच त्यांना संबोधले जायचे. हे नाव रूढ होत असतानाच याच आशयाचा प्रतिशब्द निवडून जावेद हे नाव सर्वांना आवडले. पुढे याच नावाने ते ओळखले जाऊ लागले. जावेद म्हणजे अमर आणि अख्तर म्हणजे तारा. जावेद अख्तर म्हणजे चिरंतन तारा.

माणसाची दयनीय परिस्थिती खूप काही शिकवून जाते. जावेद यांनी मुंबई गाठून नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. मुंबईत गेलो तरी वडिलांसारखी लेखनात कारकीर्द घडवायची नाही, वडिलांबद्दल इतका तिटकारा त्यांच्या मनात निर्माण झाला होता. दिग्दर्शनात काही करून दाखवण्याचे त्यांचे मनसुबे होते. लेखणीच्या बळावर त्यांना मुंबईत पाय ठेवण्यापुरती जागा मिळाली. या दिवसांत त्यांची सलीम या लेखकाशी ओळख होऊन उभयतांनी संयुक्तपणे लिखाण करण्याचा इरादा पक्का केला. राजेश खन्नांच्या मध्यस्थीने या जोडीला, ‘हाथी मेरे साथी’ हा चित्रपट लिहिण्याची संधी चालून आली. सलीम-जावेद यांनी पुढे ‘सीता और गीता’, ‘यादों की बारात’, ‘जंजीर’, ‘दीवार’, ‘शोले’ आदी असंख्य चित्रपट लिहून इतिहास निर्माण केला. पारंपरिक, चाकोरीबध्द चौकट मोडून त्यांनी कथा, पटकथा, एकूणच चित्रपटाची आगळीवेगळी वाट चोखाळून यशाचा एक नवा मापदंड निर्माण केला. ‘अँग्री यंग मॅन’ च्या इमेजचे श्रेय त्यांनाच जाते. किरकोळ गैरसमजातून सलीम-जावेद युती तुटली. वैयक्तिक अडचणीमुळे सलीमजी परदेशात निघून गेले. जावेदजी आणि कैफी आझमी यांचा विचाराचा पिंड समान होता. या सहवासात १९७० ते ८० च्या दशकात समांतर सिनेमात काम करणा-या शबाना यांच्याशी गाठीभेटी होत. यातून मैत्रीचे धागे निर्माण होऊन त्याचे रुपांतर दोघांच्या विवाहबंधनात झाले. १९९९ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ हा नागरी सन्मान बहाल करून त्यांच्या विचाराचा सन्मानच केला गेला. देश, नागरिकत्व, लोकसमजुतीच्या रोखठोक भूमिकेमुळे २००९ मध्ये त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाल्यावर स्वामित्वहक्काचा जो प्रश्न त्यांनी हाताळला त्यावर साधकबाधक चर्चा होऊन असंख्य वादळांची राळ उठली.

– रा. कों. खेडकर, मोबा. : ९९७०५ ८३९२२

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR