22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमलिक यांच्याशी राजकीय चर्चा झालेली नाही : प्रफुल्ल पटेल

मलिक यांच्याशी राजकीय चर्चा झालेली नाही : प्रफुल्ल पटेल

नागपूर : आमदार नवाब मलिक यांच्यावरून सुरु असलेल्या वादावर राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते प्रफुल्ल पटेल यांनी नवाब मलिक यांच्यासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणांमुळे जामीन मिळाला आहे. ते गुरुवारी विधानभवनात आले होते. ते आमचे सहकारी होते. त्यामुळे दोन्ही बाजूंनी त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

पटेल म्हणाले की, नवाब मलिक यांच्याशी कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झालेली नाही. त्यामुळे ते आमच्यासोबत नाहीत. निवडणूक आयोगाकडे आमदारांची यादी दिली आहे, त्यातही आम्ही मलिक यांचे नाव दिलेले नाही. त्यामुळे ते आमच्यासोबत नाहीत. मलिक यांच्यासोबत कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही. ते आमचे सहकारी असून, त्यांच्या तब्येतीची माहिती आम्ही घेतली. त्यांचे स्वागत केले, असे पटेल म्हणाले.

मुस्लीम समाजाच्या मतांसाठी आम्ही त्यांना सोबत घेऊ शकत नाही. आमचा पक्ष धर्मनिरपेक्ष विचारधारेचा आहे. त्याच्यामुळे सर्व समाजांसाठी एकत्र येऊन आम्ही प्रश्न मांडतो. पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर विरोधक हताश झाले आहेत. त्यामुळे अशा प्रकारे आरोप-प्रत्यारोप त्यांच्याकडून केले जात आहेत, असा हल्लाबोलही पटेल यांनी केला. माझ्यावरही आरोप केले जातात. त्याच्यावर शरद पवार यांनी आधीच उत्तर दिले आहे. माझ्यावरील आरोपांवर मी यापूर्वीही स्पष्टीकरण दिलेले आहे, असेही पटेल यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR