39.5 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeराष्ट्रीयईव्हीएमवर मोदींचा फोटो नाही, मतदान करणार नाही!

ईव्हीएमवर मोदींचा फोटो नाही, मतदान करणार नाही!

जयपूर : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले असून आणखी सहा टप्प्यातील मतदान शिल्लक राहिले आहे. पहिल्या टप्प्यातील मदतान १९ एप्रिल रोजी पार पडले. यादिवशी एक रंचक किस्सा घडला आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन याची माहिती दिली आहे.

काही ग्रामीण महिला मतदान करण्यासाठी पोलिंग बुथवर आल्या होत्या. त्या जेव्हा मतदानासाठी आल्या तेव्हा त्यांना ईव्हीएमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दिसला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या महिलांनी बुथमधील अधिका-यांना याबाबत विचारणा केली. आमच्या पंतप्रधान मोदींचा फोटो यावर का नाही. मोदींनाच आम्ही मतदान करणार आहोत, असे त्या म्हणाल्या. पंतप्रधान मोदी यांनी हा किस्सा सांगितला आहे.

सदर घटना राजस्थानमधील सीकरच्या पिपरानी गावातील एका पोलिंग बुथवरील आहे. सीकर लोकसभेसाठी १९ एप्रिल रोजी मतदान झाले होते. सकाळी अकरा वाजता महिलांचा एक गट पोलिंग बुथवर आला होता. ग्रामीण महिला गीत गात मतदान करण्यासाठी आल्या होत्या. पण, ईव्हीएमवर मोदींचा फोटो न दिसल्याने त्या हैराण झाल्या. मतदान केंद्रात या मुद्यावर काहीसा गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर बुथमधील अधिका-यांनी महिलांना समजावून सांगितले की, ईव्हीएमवर पंतप्रधान मोदी यांचा नाही तर त्यांच्या पक्षाचे चिन्ह असते. शिवाय त्यांच्या मतदारसंघातून मोदी नाही तर त्यांचा प्रतिनिधी म्हणून दुसरा उमेदवार रिंगणात आहे. खूप समजवल्यानंतर महिलांना अधिका-यांचे म्हणणे पटले. त्यानंतर महिलांनी मतदान केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाचे कार्यकर्ता लक्ष्मीकांत भारद्वाज यांनी शेअर केलेले एका वृतपत्राचे कात्रण सोशल मीडियावर रिट्विट केले आहे. पंतप्रधान मोदी ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हणालेत की, माता-भगिनीचे असे प्रेम पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले. माझा संकल्प हेच कर्ज फेडण्याचा आहे. पण, लक्ष्मीकांतजी आपल्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी अशा छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यावे. घरोघरी जाऊन लोकांचा जागृत करावे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR