29.8 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeराष्ट्रीयनिवडणुकीपूर्वी महुआ मोईत्रांना दिलासा

निवडणुकीपूर्वी महुआ मोईत्रांना दिलासा

नवी दिल्ली : वकील जय अनंत देहाद्राई यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्याविरोधातील मानहानीचा खटला मागे घेतला आहे. वकील जय अनंत देहाद्राई यांनी दिल्ली हायकोर्टामध्ये यासंदर्भात अर्ज करत मानहानीचा खटला मागे घेत असल्याचे कळवले आहे.

देहाद्राई यांनी महुआ मोईत्रा यांच्याविरोधात मानहानी खटला दाखल केला होता. महुआ मोईत्रा यांनी सोशल मीडियावर काही पोस्ट केल्या होत्या. त्यामध्ये देहाद्राई यांच्या खासगी आणि व्यावसायिक कामाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. त्यानंतर देहाद्राई यांनी महुआ मोईत्रा यांच्याविरोधात दिल्ली हायकोर्टात २ कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला होता.

महुआ मोईत्रा यांची प्रश्नांच्या बदल्यात गिफ्ट घेतल्याप्रकरणी खासदारकी गेली आहे. याच दरम्यान महुआ मोईत्रा यांनी देहाद्राई यांच्यावर आक्रमक टीका केली होती. यासर्व प्रकरणामध्ये देहाद्राई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह मजूकर हटवण्यात यावा अशी मागणी देहाद्राई यांनी केली होती.

देहाद्राई यांनी यापूर्वी आरोप केला होता की, संसदेमध्ये प्रश्न विचारण्यासाठी महुआ मोईत्रा यांनी व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून लाच घेतली. याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा सभापती ओम प्रकाश बिर्ला यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. मोईत्रा यांनी देखील देहाद्राई आणि दुबे यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. पण, मोईत्रा यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली होती.

मोईत्रा यांनी आपला संसदेचा लॉगईन दर्शन हिरानंदानी यांच्यासोबत शेअर केल्याचा आरोप होता. याप्रकरणी एक समिती स्थापन करण्यात आली. समितीने रिपोर्ट सादर केल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. त्यांना तृणमूल काँग्रेसकडून पुन्हा एकदा खासदारकीसाठी तिकीट देण्यात आलं आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR